Pune News: स्लो पॉयझन, कॉन्ट्रॅक्ट किलर आणि जपानी व्हिडिओ ! केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासे

Ketan Agarwal Murder Case: संपूर्ण देशभर गाजत असलेल्या पुण्यातील केतन अग्रवाल हत्येप्रकरणाला आता एक पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे. या

जाहिरात
Read Time: 3 mins
Ketan Agarwal Murder Case: ख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
पुणे:

Ketan Agarwal Murder Case: संपूर्ण देशभर गाजत असलेल्या पुण्यातील केतन अग्रवाल हत्येप्रकरणाला आता एक पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे. या हत्या प्रकरणातील काही खळबळजनक माहिती समोर आली आहे.  या माहितीमुळे मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकेल असा हा संपूर्ण कट असून, इंटरनेटवरील सर्च हिस्ट्री, गुपचुप उरकलेले लग्न आणि चक्क एका जुन्या मृत्यूच्या बातमीचा आधार घेऊन केतनचा काटा काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे आता थेट राजस्थानपर्यंत पोहोचले आहेत.

स्लो पॉयझन देण्याचा प्लॅन 

या प्रकरणात 'एबीपी न्यूज' नं पोलिसांच्या सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी मे 2025 मध्येच केतनच्या हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी केतनला हळूहळू असर करणारे विष (स्लो पॉइजन) देऊन संपवण्याचा किंवा त्याला आयुष्यभरासाठी अपंग करण्याचा क्रूर बेत आखला होता. त्यांनी तसा प्रयत्नही केला, पण वेळेवर विष उपलब्ध न झाल्याने हा प्रयत्न फसला.

Advertisement

त्यानंतर त्यांनी थेट करारावर मारेकरी (कॉन्ट्रॅक्ट किलर) शोधून केतनच्या हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न केला. एक व्यक्ती यासाठी तयारही झाली होती, परंतु नंतर ती घाबरली आणि तिने नकार दिला. आता हाच माणूस पोलिसांचा सर्वात मोठा साक्षीदार बनला आहे. ज्या हॉटेलमध्ये ही बैठक झाली, तिथले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.

( नक्की वाचा : Lohagad Fort: लोहगडावरील 'सिया पॉईंट'पाहण्यासाठी देशभरातून गर्दी; 2000 वर्षांच्या इतिहासाला अनपेक्षित वळण )

राजस्थानमध्ये गुपचुप लग्न?

या संपूर्ण हत्येमागे सिया आणि चेतन यांचे छुपे लग्न कारणीभूत असल्याचा संशय आहे. या दोघांनी साल 2025 मध्ये गुपचुप लग्न उरकले होते का, याचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक थेट राजस्थानच्या खाटू श्याम मंदिरात पोहोचले आहे. पोलिसांनी मंदिर प्रशासनकडून त्या काळातील सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे.

पोलिसांना या दोघांच्या लग्नाचे 2 फोटोही मिळाले असून, ते खरे आहेत की त्यात फेरफार (मॉर्फ) करण्यात आला आहे, याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. हे लग्न जगासमोर येऊ नये म्हणूनच केतनचा बळी घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

( नक्की वाचा : Siya Goyal: सिया आणि केतनच्या कारमध्ये काय घडलं? ड्रायव्हरने पाहिलेला तो सीन सियाला जेलमध्ये सडवणार! )

कशी सुचली लोहगडची कल्पना?

केतनची हत्या ज्या लोहागड किल्ल्यावर झाली, तिथेच हा कट अंमलात आणण्याची कल्पना सियाला एका जुन्या बातमीवरून सुचली होती. 18 मार्च 2025 रोजी लोहागड किल्ल्यावरून पडून एका 21 वर्षीय कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. ही बातमी वाचून सियाने चेतनसोबत मिळून ठरवले की, केतनलाही याच ठिकाणी संपवायचे. 

Advertisement

केतनला ट्रेकिंगची आवड असल्याने त्याला तिथे नेणे सोपे होते, तसेच तिथे सीसीटीव्ही नसल्याने आणि गर्दी कमी असल्याने पकडले जाण्याची भीती नव्हती. हत्येपूर्वी 31 मे रोजी दोघांनी तिथे जाऊन जागेची पाहणी (रेकी) केली होती, तसेच तिथले सेल्फी आणि व्हिडिओही बनवले होते. आता पोलीस त्या 21 वर्षीय मुलीच्या आत्महत्येच्या प्रकरणाचीही 1 वर्षानंतर पुन्हा चौकशी करत आहेत, कारण ती आत्महत्या नसून हत्या असण्याचा पोलिसांना संशय आहे.

जापानी व्हिडिओ का पाहिले?

हत्या केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून कसे सुटायचे आणि आत्मविश्वासाने खोटे कसे बोलायचे, याचे विशेष प्रशिक्षणही या दोघांनी घेतले होते. अटक झाल्यानंतर शांत कसे राहायचे आणि पोलिसांच्या प्रश्नांना कसे तोंड द्यायचे, हे शिकण्यासाठी सिया आणि चेतन यांनी इंटरनेटवर तब्बल 2 तास लांबीचे जापानी व्हिडिओ पाहिले होते. पोलिसांनी या दोघांच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीमधून या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स जप्त केल्या आहेत. हा डिजिटल पुरावा न्यायालयात आरोपींना अडकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement

Topics mentioned in this article