यशपाल सोनकांबळे, पुणे
Pune Lohagad Case: पुण्यातील हाय-प्रोफाइल केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांच्या हाती आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि चक्रावून टाकणारा पुरावा लागला आहे. केतन अग्रवालची होणारी पत्नी आणि मुख्य आरोपी सिया गोयल हिने हत्येचा कट रचण्यापूर्वीच तिचा प्रियकर आणि या गुन्ह्यातील सह-आरोपी चेतन चौधरी याच्याशी गुपचूप विवाह केला होता.
कुटुंबाच्या भीतीने त्यांनी हे लग्न लपवून ठेवले होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. आरोपींच्या जप्त केलेल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट्स आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
व्हॉट्सॲप चॅट्स आणि 6 महिन्यांच्या डेटावरून गुपित उघड
लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून 18 जून रोजी केतन अग्रवालला दरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सिया आणि चेतन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी गेल्या 6 ते 7 महिन्यांमधील आरोपींचे कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा, व्हॉट्सॲप चॅट्स आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची कसून तपासणी केली.
(नक्की वाचा- Video Viral: मुलं किंचाळत होती, महिलेने हात जोडले, तरी दया आली नाही, टोळक्याचा कार चालकावर हल्ला, कारण...)
या डिजिटल पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे की, सिया आणि चेतनने सुमारे चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता गुप्त लग्न केले होते. कुटुंबाकडून या प्रेमविवाहाला तीव्र विरोध होईल या भीतीने त्यांनी हे लग्न गुपित ठेवले होते. पोलिसांच्या संशयानुसार, या गुप्त लग्नानंतरच केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.
(नक्की वाचा- Pandharpur Wari: वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी; राज्य सरकारचा निर्णय)
सिया घाबरल्याने हत्येचा पहिला प्रयत्न फसला
पोलीस तपासात केवळ गुप्त लग्नाचाच नाही, तर हत्येच्या पहिल्या अपयशी प्रयत्नाचाही खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी केतन अग्रवालला मारण्याचा पहिला प्रयत्न 14 जून रोजी केला होता. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी सिया गोयल हिची हिंमत खचल्यामुळे त्यांचा तो पहिला प्लॅन पूर्णपणे फसला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world