पुणे:
सातारा पुणे महामार्गावर खंडाळ्यानजीक खंबाटकी घाटात दुपारी भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जणं गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर भुईंज पोलीस व शिरवळ येथील रेस्क्यू टीमच्या साहाय्याने जखमींना खंडाळ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महामार्गावरील या भीषण अपघातात कंटेनरने धडक दिल्यामुळे तब्बल दहा वाहनांचा चक्काचूर झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने रस्त्यातील दहा वाहनांना धडक दिल्यामुळे वाहनांचे गंभीर नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.