जाहिरात
This Article is From Sep 22, 2024

खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटात भीषण अपघात; कंटेनरची 10 वाहनांना धडक, 8 जणं गंभीर जखमी

सातारा पुणे महामार्गावर खंडाळ्यानजीक दुपारी भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जणं गंभीर जखमी झाले आहेत.

खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटात भीषण अपघात; कंटेनरची 10 वाहनांना धडक, 8 जणं गंभीर जखमी
पुणे:

सातारा पुणे महामार्गावर खंडाळ्यानजीक खंबाटकी घाटात दुपारी भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जणं गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर भुईंज पोलीस व शिरवळ येथील रेस्क्यू टीमच्या साहाय्याने जखमींना खंडाळ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महामार्गावरील या भीषण अपघातात कंटेनरने धडक दिल्यामुळे तब्बल दहा वाहनांचा चक्काचूर झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने रस्त्यातील दहा वाहनांना धडक दिल्यामुळे वाहनांचे गंभीर नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: