Pet Dog : पाळीव प्राण्यांमध्ये वाढतोय किडनीचा हा आजार, प्राणीपालकच करतायेत मोठी चूक; पशूवैद्यकीय तज्ज्ञांकडून अलर्ट 

अलीकडे पाळीव प्राण्यांमध्ये विशेषता श्वानांमध्ये किडनी विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी

पाळीव प्राण्यांमध्ये श्वानांना पाळण्यात अनेकांची पहिली पसंती असते. श्वान एक प्रामाणिक प्राणी असल्याने घराच्या सुरक्षिततेसाठी श्वानांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. तर पाळलेला श्वान हा अनेकांच्या परिवाराचा एक घटक होऊन जातो. त्यामुळे त्याबद्दल निर्माण झालेली आपुलकी आणि जिव्हाळा हा वाढतो. मात्र अलीकडे पाळीव प्राण्यांमध्ये विशेषता श्वानांमध्ये किडनी विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पशु वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते रिझर्व्हेटिव्ह फूड व आवश्यकतेपेक्षा अधिक मांस सेवनामुळे श्वानांची किडनी डॅमेज होऊन किडनी विकार उद्भवण्याचा धोका वाढला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पशुवैद्यकीय उपायुक्त प्रदीप झोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळीव प्राण्यांना किडनी विकारांपासून बचाव करण्यासाठी प्रामुख्याने पाळीव प्राण्यांची स्वच्छता योग्य व पोषक आहार तसेच योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रिझर्व्हेटिव्ह किंवा पॅकेजिंग असलेले फूड जास्त खाऊ घातल्याने पाळीव प्राण्यांना आणि प्रामुख्याने श्वानांना किडनी विकार असा धोका अधिक वाढतो. तर काही तज्ज्ञांच्या मते पाळीव प्राण्यांना अधिक प्रमाणात देण्यात येणारे अँटिबायोटिक औषध त्याचा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे लॅक्टोस्पायरोसिससारखा आजार होऊन याचा परिणाम किडन्यांवर होऊ शकतो. 

नक्की वाचा - Amravati News: चिखलदऱ्यात 500 फूट खोल दरीच्या काठावर कार, चार युवकांचा जीव मुठीत, पुढे जे घडलं ते...

किडनीचे विकार टाळण्यासाठी उपाय योजना 

  • पाळीव प्राण्यांना व श्वानांना प्रिझर्वेटिव्ह फूड योग्य प्रमाणात द्यावे 
  • मास अति प्रमाणात देणे टाळावे 
  • सकस व समतोल आहार द्यावा 
  • सकाळ संध्याकाळ प्राण्यांना मोकळ्या हवेत फिरायला घेऊन जावे 
  • प्राण्यांची नियमित वैद्यकीय तपासणी  रावी 
  • मानवाप्रमाणेच प्राण्यांच्या किडनीचे कार्य हे सारखेच असते त्यामुळे पाळीव प्राण्याच्या आहारात समतोल राखणे व प्राण्याच्या शरीराची क्षमता पाहून त्यानुसार आहार देणे हे आवश्यक आहे.