जाहिरात

Amravati News: चिखलदऱ्यात 500 फूट खोल दरीच्या काठावर कार, चार युवकांचा जीव मुठीत, पुढे जे घडलं ते...

अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते ओले झाले होते. दरम्यान गाविलगड किल्ला मार्गावरील एका प्रसिद्ध सेल्फी पॉइंटजवळ या चार मित्रांनी कार उभी केली होती.

Amravati News: चिखलदऱ्यात 500 फूट खोल दरीच्या काठावर कार, चार युवकांचा जीव मुठीत, पुढे जे घडलं ते...
अमरावती:

शुभम बायस्कार

चिखलदरा येथील किल्ला मार्गावर रविवारी सायंकाळी 6 वाजता एक मोठा अपघात टळला. चार तरुण असलेली क्रेटा कार जवळपास 500 फूट खोल दरीत कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना सुदैवाने वाचली. हे चारही तरुण चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. दरम्यान गवत ओले असल्याने कार घसरत दरीच्या काठावर गेली होती. मात्र दुर्घटना घडली नसल्याचे चिखलदरा पोलिसांनी सांगितले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते ओले झाले होते. दरम्यान गाविलगड किल्ला मार्गावरील एका प्रसिद्ध सेल्फी पॉइंटजवळ या चार मित्रांनी कार उभी केली होती. परंतु ओल्या गवतामुळे आणि चिखलामुळे कारचा ताबा सुटला आणि ती दरीच्या दिशेने घसरू लागली. काही क्षणांतच कारचा एक भाग हवेत लटकलेला दिसला. मात्र याच ठिकाणी उपस्थित इतर नागरिकांनी प्रसंगावधान राखत मदतीसाठी त्वरित धाव घेतली.

ट्रेंडिंग बातमी - Panchkula Death Mystery: काचेवर टॉवेल, गाडीत 7 मृतदेह.. जीव सोडण्याआधी हादरवणारं कारण सांगितलं!

गाडी दरीच्या तोंडावर घसरत होती. त्यावेळी कारमध्ये चार तरुणी उपस्थित होते. त्यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र तिथल्या जिगरबाज लोकांनी या चारही युवकांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले. चिखलदरा हे विशेषतः तरुणांमध्ये एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. मात्र पावसाळ्यात ही ठिकाणे अत्यंत धोकादायक ठरू शकतात. भविष्यात अशा कोणत्याही गंभीर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com