'अपमानास्पद वागणूक देऊ नका', किरीट सोमय्या भाजपावरच नाराज? 'लेटरबॉम्ब' टाकून धुडकावला आदेश

किरीट सोमय्या यांनी न विचारता नावाची घोषणा केली ही पद्धत चुकीची असून मला ही मान्य नाही. मला पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, असंही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रात उद्धव ठाकरे यांचा देखील उल्लेख केला आहे. 

Advertisement
Read Time: 3 mins

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली होती. मात्र किरीट सोमय्या यांनी हे सदस्य पद स्वीकारण्यासा नकार देत पक्षाचे काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. याबाबत किरीट सोमय्या यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. 

मला न विचारता नावाची घोषणा केली ही पद्धत चुकीची असून मला ही मान्य नाही. मला पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी उघड नाराजी किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रात उद्धव ठाकरे यांचा देखील उल्लेख केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

"मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडे पाच वर्ष,  म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. 3 वेळा माझ्यावर जीवघेणे हल्लेही झाले. मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार", असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा - कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड, अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO आला समोर)

Kirit Somaiya

रावसाहेब दानवे यांना लिहिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

"आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी. 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा-शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्स/कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे." 

(नक्की वाचा - बारामतीत महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेनेच्या नेत्याने अजित पवारांच्या फोटोवर टाकलं काळं कापड)

मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती. माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले. तरीही मी जवाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. या विभानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतः ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतो, करत राहणार. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.
 

Topics mentioned in this article