कोल्हापूर-पुणे अंतर होणार कमी, वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ; किती असणार तिकीट? 

कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी तर पुणे-कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा आज शुभारंभ होणार आहे. सायंकाळी 4.15 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने तर रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा प्रत्यक्ष उपस्थित राहून कोल्हापूर स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोल्हापूर स्थानकावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी तर पुणे-कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याचवेळी कोल्हापूर स्थानकावरही रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

(वाचा-  Pune Traffic : गणेश मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख 17 रस्ते राहणार बंद )

नव्या वंदे मेट्रोची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती ताशी 200 किलोमीटर वेगाने रुळांवर धावू शकते. पण त्याचा वेग 100 ते 150 किमी सध्या निश्चित करण्यात आला आहे. वंदे भारत रेल्वेची ही सेवा पुणेकर आणि कोल्हापूरकरांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ट्रेनमधील लोकांचा प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी त्यात आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

(वाचा - Cyber Crime : राज्यापुढे नवं संकट, नवी मुंबईतील त्या गुन्ह्याने खळबळ; नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन)

कोल्हापूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या एसी डब्याचे तिकीट दर 1,160 रुपये आणि एसी एक्झिक्युटिव्ह डब्यासाठी 2000 रुपये तिकीट दर असणार आहेत. नव्या वंदे भारत ट्रेनमुळे सध्याच्या महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत कोल्हापूर ते पुणे दरम्यानचा प्रवास सुमारे दोन तासांनी कमी होणार आहे. कोल्हापूरहून 4.15 वाजता सुटणारी ट्रेन पुण्यात रात्री 10.40 वाजता पोहोचेल. 

Topics mentioned in this article