Badlapur News : बदलापुरकरांसाठी आनंदाची बातमी; घरपट्टीतून पैसे वाचणार? काय आहे नवी घोषणा? 

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 हजार 98 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्षांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min

Badlapur News : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 हजार 98 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बदलापूरच्या नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी 11.76 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. 

बदलापुरकरांसाठी मोठी घोषणा...

या अर्थसंकल्पात बदलापुरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे घरपट्टी म्हणजेच मालमत्ता करात 50 टक्के सवलत देणार असल्याची घोषणा केली आहे. हा अंदाजित अर्थसंकल्प असून लवकरच प्रशासनाकडून यावर निर्णय घेण्यात येईल. घरपट्टीशिवाय बदलापुरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी आणखी एक घोषणा केली आहे.

Advertisement

नक्की वाचा - लाडक्या बहि‍णींनी झटका; तब्बल 90 लाख महिलांची नावं हटवली, तुमचं नाव अजूनही आहे का? या लिंकवर लगेच तपासा

नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेसारख्या महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यातून बदलापुरात  नगराध्यक्षा सुकन्या योजनेच्या माध्यमातून बदलापुरात जन्माला येणाऱ्या मुलीचं स्वागत केलं जाईल. तिच्या नावाने 5 हजारांची ठेव ठेवण्यात येईल, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठेवीचा शिक्षणासाठी उपयोग करता येईल, असंही यावेळी सांगण्यात आलं. 
 

Topics mentioned in this article