Kunal Kamra: कुणाल कामरा नेमका कुठे आहे? पोलिसांना फोन करुन त्याने काय सांगितले?

दरम्यान कामरा विरोधात शिंदे गट आक्रमक झाला असताना त्याने फोडतोडीवर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवीता केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गट आक्रमक झाला आहे. कामरा कुठे आहे हे शोधले जात आहे. काही ठिकाणी त्याच्या विरोधात तक्रारी ही दाखल करण्यात आल्या आहेत. अशा वेळी मुंबई पोलिसही त्याचा शोध घेत आहे. मात्र आता कुणाल कामराच समोर आला आहे. त्याने स्वत: खार पोलिसांना आपण कुठे आहोत? कधी पर्यंत मुंबईत येणार आहोत याची माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुणाल कामरा याने NDTV मराठी बरोबर बोलताना आपण खार पोलिसांना संपर्क साधला होता असं स्पष्ट केलं आहे. शिवाय त्यांच्याकडे एक आठवड्याचा कालावधी मागितला आहे. त्यावर पोलिसांनी आपल्याला जितक्या लवकर येता येईल तितक्या लवकर मुंबईत या. शिवाय तुमच्या जबाब ही नोंदवायचा आहे असं पोलिसांनी सांगितल्याचं कामरा यांनी सांगितलं. आपण पोलिसांनी संपूर्ण सहकार्य करू असं ही त्याने स्पष्ट केलं. 

ट्रेंडिंग बातमी - Kunal Kamra : 'बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटोची लॉरी उलटवणार?' तोडफोडीनंतर कामराची पहिली इन्स्टा पोस्ट चर्चेत

त्यानंतर त्याने पोलिसांनी आपल्याला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सतत धमकीचे फोन येत आहेत. शिवाय आपल्याला मारणार असल्याचं ही ते बोलत आहेत. असंही कामरा यांनी पोलिसांना कळवलं आहे. आपण लवकरच मुंबईत येणार आहोत. शिवाय आपलं म्हणणं ही पोलिसां समोर मांडू असं तो म्हणाला. सध्या आपण पाँडेचेरीत आहोत. तिथे आपले बरेचशे पॉडकास्ट आहेत. ते पूर्ण करायचे आहेत. ते केल्यानंतर मुंबईत येणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Disha Salian: सालियान प्रकरणाला नवी 'दिशा', आता आदित्य ठाकरें बरोबर उद्धव ठाकरे ही अडकणार?

दरम्यान कामरा विरोधात शिंदे गट आक्रमक झाला असताना त्याने फोडतोडीवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. हॅबिटॅट हे केवळ मनोरंजनाचं व्यासपीठ आहे. येथे विविध प्रकारचे कार्यक्रमं होतात. हॅबिटॅट किंवा इतर कोणतंही व्यासपीठ माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. याशिवाय मी काय म्हणतो यावर त्यांचं नियंत्रण नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही. स्टँडअप कॉमेडियनच्या सादरीकरणासाठी  कार्यक्रमाच्या ठिकाणाला जबाबदार धरणं म्हणजे बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटोची लॉरी उलटवण्यासारखं आहे, असा टोला त्याने शिंदे गटाला लगावला आहे.   

Topics mentioned in this article