
Kunal Kamra Insta post : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गायलेल्या गाण्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काल 24 मार्चला अधिवेशनाही कामरावर कारवाई आणि अटकेची मागणी करण्यात आली. दरम्यान कामराने मात्र आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं. काही तासांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करीत आपलं म्हणणं मांडलं. चार पानी स्टेटमेंटमध्ये त्याने माफी मागणार नसल्याचं सांगितलं. अजित पवार एकनाथ शिंदेंबद्दल जे बोलले होते तेच म्हणत त्याने या पोस्टमधून राजकीय चिमटे काढल्याचं दिसून येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माझ्या स्टँडअपसाठी हॅबिटॅटला दोष का?
हॅबिटॅट हे केवळ मनोरंजनाचं व्यासपीठ आहे. येथे विविध प्रकारचे कार्यक्रमं होतात. हॅबिटॅट किंवा इतर कोणतंही व्यासपीठ माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही याशिवाय मी काय म्हणतो यावर त्यांचं नियंत्रण नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही. स्टँडअप कॉमेडियनच्या सादरीकरणासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणाला जबाबदार धरणं म्हणजे बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटोची लॉरी उलटवण्यासारखं आहे.
आपल्याला संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ शक्तिशाली आणि श्रीमंतांची स्तुती करण्यासाठी नाही, सद्याची माध्यमं आपल्याला तसं भासवत असले तरीही.. मोठ्या व्यक्तींवरील विनोद सहन करण्याची तुम्ही असमर्थ असाल तर त्यामुळे माझ्या हक्कावर गदा आणू शकत नाही. माझ्या माहितीनुसार, आपल्या नेत्यांची किंवा राजकीय व्यवस्थेत झालेल्या गोंधळाची थट्टा करणं कायद्याच्या विरोधात नाही. मात्र तरीही मी पोलीस आणि कोर्टाच्या कायदेशीर कारवाईसाठी सहकार्य करायला तयार आहे.
मात्र विनोदाने नाराज झाल्यास तोडफोड करणं योग्य प्रतिसाद असल्याचं ज्यांना वाटतं त्यांच्याविरुद्ध कायदा निष्पक्ष आणि समान असेल का? आज हॅबिटॅटला पूर्वसूचना न देता आलेल्या आणि हॅबिटॅटवर हातोडा मारणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? माझ्या पुढील कार्यक्रमासाठी, मी एल्फिन्स्टन पूल किंवा मुंबईतील इतर कोणत्याही इमारतीची निवड करेन. मला वाटतं मग त्यालाही त्वरित पाडण्याची गरज आहे, असंही तो यावेळी म्हणाला.
नक्की वाचा - Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल
माझा नंबर लिक करून मला सतत कॉल करणाऱ्यांना माहीत झालं असेल की माझे सर्व अनोळखी कॉल व्हॉइसमेलवर जातात. तिथं तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल जे तुम्हाला अजिबातच आवडत नाही. त्याशिवाय या सर्व तमाशाचं प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनी लक्षात ठेवावं की, भारत देश पत्रकार स्वातंत्र्याच्या बाबतीत 159 क्रमांकावर आहे.
मी माफी मागणार नाही...
मी जे म्हटलं तेच नेमकं अजित पवार एकनाथ शिंदेंबद्दल बोललं होते. मी या जमावाला घाबरणार नाही आणि हे शांत होण्याची वाट पाहत पलंगाखाली लपणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world