जाहिरात

Big News: लाडकी बहिण योजनेच्या E-KYC प्रक्रियेस मुदतवाढ, आता 'या' तारखे पर्यंत करता येणार E-KYC

EKYC करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या. ओटीपी सेंट केल्यानंतर ही तो महिलांना मिळत नव्हता.

Big News: लाडकी बहिण योजनेच्या E-KYC प्रक्रियेस मुदतवाढ, आता 'या' तारखे पर्यंत करता येणार E-KYC
मुंबई:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसी करता आली नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई केवायसी मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची 18 नोव्हेंबर 2025 ची तारीख देण्यात आली होती. आता त्याला अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार  31 डिसेंबर 2025 पर्यंत EKYC करता येणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या. तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. 

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: eKYC ला मुदत वाढ मिळणार? OTP चा घोळ वाढला, लाडक्या बहिणींचे टेन्शन ही वाढलं!

या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.

नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय

EKYC करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या. ओटीपी सेंट केल्यानंतर ही तो महिलांना मिळत नव्हता. त्यामुळे ई केवायसी करण्यास अडचण येत होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात लाडक्या बहीणींची धाकधूक वाढली होती. त्यामुळे ई केवायसी करण्यास मुदतवाढ मिळणार की नाही याकडे महिलांचे लक्ष लागले होते. पण आता त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांना 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसी करता  येणार आहे.       

Listen to the latest songs, only on JioSaavn.com