जाहिरात

Lalbaugcha Raja 2025: मिया खलिफालाही दर्शनाला बोलवा! लालबागचा राजाच्या VIP दर्शनावर Insta Influencer संतापला

ओंकारने आपल्या व्हिडिओमध्ये थेट इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा आणि सनी लिओनी यांच्या क्लिप दाखवत संताप व्यक्त केला. त्यांच्या ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाच्या क्लिप दाखवून त्याने प्रश्न उपस्थित केला की, अशा सेलिब्रिटींना थेट दर्शन कसे मिळते?

Lalbaugcha Raja 2025: मिया खलिफालाही दर्शनाला बोलवा! लालबागचा राजाच्या VIP दर्शनावर Insta Influencer संतापला

मुंबईतील ‘लालबागचा राजा' हा गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक तासंतास रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतात. मात्र, मंडळातील व्हीआयपी आणि सर्वसामान्य भक्तांमध्ये होणारा भेदभाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. आता यावर प्रसिद्ध कॉन्टेन्ट क्रिएटर ओंकार शिंदे (@onkarshindee) याने आपल्या व्हिडिओमधून परखड भाष्य करत अनेक लोकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

ओंकारने आपल्या व्हिडिओमध्ये थेट इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा आणि सनी लिओनी यांच्या क्लिप दाखवत संताप व्यक्त केला. त्यांच्या ‘लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या क्लिप दाखवून त्याने प्रश्न उपस्थित केला की, अशा सेलिब्रिटींना थेट दर्शन कसे मिळते? अजून मिया खलिफा, जॉनी सिंस यांनाही फेमस करा. सामान्य भक्तांना मात्र, तासनतास रांगेत उभे राहावे लागते, असंही ओंकार शिंदेंने म्हटलं. "हे गणपती बाप्पा या लालबागच्या मंडळाला चांगली बुद्धी दे एवढीच प्रार्थना करतो" असं कॅप्शन त्यांना आपल्या पोस्टला दिलं आहे.

(नक्की वाचा-  Lalbaugcha Raja News: लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात! मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस)

सामान्य भक्तांना ‘मायक्रो सेकंदात धक्का'

ओंकार शिंदेने आपल्या व्हिडिओमध्ये दर्शनादरम्यान होणाऱ्या भेदभावावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘बाप्पाच्या एका पायाचे दर्शन घेताना सुरक्षा रक्षक भाविकांना ‘मायक्रो सेकंदात' धक्का देऊन पुढे ढकलतात. मात्र, दुसऱ्या पायाजवळ व्हीआयपी लोकांना आरामात दर्शन आणि फोटो काढण्यासाठी वेळ दिला जातो.' सामान्य भक्तांना हे पाहून वाईट वाटते, पण आपण काहीही करू शकत नाही ही हतबलताही असते, असे ओंकारने नमूद केले आहे.

(नक्की वाचा-  बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज; सुरक्षित विसर्जनासाठी BMC ने दिल्या महत्त्वाच्या सूचना)

अंजली अरोराच्या कॉन्टेन्टवर देखील त्याने आक्षेप घेत तिला VVIP दर्शन मिळत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.  तर सनी लिओनीच्या सुरुवातीच्या करिअरची आठवण करून देत ओंकारने म्हटले की, ‘तिचा आपल्या संस्कृतीशी किंवा देवाशी काहीही संबंध नाही, फक्त प्रसिद्ध होण्यासाठी आणि आपली इमेज चांगली करण्यासाठी ही मंडळी येथे येतात. या लोकांना थेट दर्शन मिळते, तर ज्या लोकांनी या मंडळाला मोठे केले, त्याच लोकांना तासनतास रांगेत थांबावे लागते. आणि जसं तुम्ही दर्शनासाठी जाता तसं तुम्हाला झिरो पॉईंट झिरो झिरो सेकंदा भिरकावलं जातं. यावर त्याने टीका केली.

‘आपण त्याच लायकीचे आहोत'

ओंकारने कोणालाही दोष न देता, लोकांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उभे केले. तो म्हणाला, तुम्ही कोणाला प्रसिद्ध करता, कोणाला मोठे करायचे, कुणाला मतदान करायचं, याच्या अकला आपल्याला अजूनही आलेल्या नाहीत हे मान्य करावे लागेल. त्यामुळे हे आपल्यासोबत घडणारच आहे, आपण त्याच लायकीचे आहोत. लालबाग मंडळ जयहिंद. अजून मिया खलिफा, जॉनी सिंस यांनाही फेमस करा.' ओंकारच्या या परखड भूमिकेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर समर्थन केले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com