सुनीलकुमार कांबळे, प्रतिनिधी
Latur Crime : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर झाडली गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. लातूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लातूर महानगर पालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या पॅराडाईज या शासकीय निवासस्थानी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. गंभीररित्या जखमी अवस्थेत त्यांना लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचे नेमके कारण मात्र समोर आलेले नाही. पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून रिव्हॉल्वर ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा - Pune News : जमीन कराराचं उल्लंघन ते कर्मचाऱ्यांचा छळ, मंगेशकर हॉस्पिटलचा 'हा' इतिहास माहिती आहे?
शनिवारी आपल्या कुटुंबीयासोबत जेवण केल्यानंतर ते त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि त्यांनी गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे. फॉरेन्सिर टीम घटनास्थळी दाखल झाली. लातूर जिल्ह्यात बाबासाहेब मनोहरे अत्यंत चांगलं काम करीत आहेत. मात्र अचानक त्यांनी आत्महत्येचं पाऊल का उचलण्याचा प्रयत्न केला, याबाबत नेमकी माहिती कळू शकलेली नाही.