Lenskart Dresscode Policy : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या TCS च्या HR पॉलिसीवरुन वाद निर्माण झाला आहे. तेथील एचआर हेडविरोधात कर्मचाऱ्यांना धर्मपरिवर्तनासाठी उत्तेजित आणि दबाव निर्माण केल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण ताजं असताना लेन्सकार्ट कंपनी वादात सापडली आहे. लेन्सकार्टसंबंधित एक ड्रेसकोड पॉलिसीचं दस्ताऐवज लीक झालं आहे. यामधील नियमावलीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण...
हिजाबला परवानगी, मात्र टिकली-टिळा बंदी...
टीसीएसनंतर आता लेन्सकार्टवर त्यांच्या ग्रुमिंग गाइडवरुन टीका केली जात आहे. कंपनीच्या ड्रेसकोड पॉलिसीसंबंधित एक लीक दस्तऐवजामधील काही गोष्टी वादात सापडल्या आहेत. या दस्तऐवजानुसार, येथे आयवेयर स्टार्टअपमध्ये काम करीत असताना कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्याची परवानगी आहे, मात्र टिकली, टिळा किंवा हातातील रक्षासूत्र घालण्यास बंदी आहे.
Hi, all. I've been seeing an inaccurate policy document going viral about Lenskart.
— Peyush Bansal (@peyushbansal) April 15, 2026
I want to speak directly that this document does not reflect our present guidelines.
Our policy has no restrictions on any form of religious expression, including bindi and tilak, and we…
लेन्सकार्ट ऑफिसमधील ड्रेसकोड संबंधित गाइडलाइनसंबंधित एक दस्तावेज लीक झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. येथे कामाच्या ठिकाणी हिजाब घालण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र टिकली, टिळा लावण्याची परवानही नाही, यावर लोकांनी आक्षेप नोंदवला आहे. यावर लेन्सकार्टचे संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल यांनी स्पष्ट केलं की, आता कंपनीच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आला आहे आणि या दस्ताऐवजाचा कंपनीच्या सध्याच्या नियमावलीशी संबंध नाही.
So these images were shared with me by someone whom I trust. I have no way of confirming this, but I checked with two diff AI platforms and they think these appear to be authentic and are from the Lenskart academy style guide. I would like someone to dig deeper and check if these… pic.twitter.com/NUgyblbb0K
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) April 15, 2026
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर शेफाली वैद्य यांनी लिहिलंय, लेन्सकार्टवर हिजाब घालण्यास परवानगी, मात्र टिकली, टिळा, रक्षा सूत्रास परवानही का नाही? शेफाली वैद्य यांनी लेन्सकार्टच्या संस्थापकांना टॅग करीत X वर ही पोस्ट शेयर केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world