जाहिरात
26 days ago

Breaking news:  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (२२ मे) पुणे विभागातील केडगाव व लोणंदसह राज्यातील १५ अमृत स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर २०२२ मध्ये 'अमृत भारत स्थानक' योजना सुरू केली होती. 

'अमृत भारत स्थानक' योजनेअंतर्गत, देशभरातील १ हजार ३०९ स्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे. पंतप्रधान यांनी पहिल्यांदा ६ ऑगस्ट २०२३ आणि नंतर २६ फेब्रुवारी २०२४ अशा दोन टप्प्यांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी  केली होती. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानके दीर्घकालीन विकास, बहुआयामी एकात्मिकीकरण, दिव्यांगजनांसाठी वाढीव सुविधा, शाश्वततेमध्ये सुधारणा आणि शहरी केंद्र म्हणून भविष्याच्या दृष्टीने सज्ज असलेल्या रेल्वे स्थानकामध्ये परावर्तीत करण्यावर भर दिला गेला आहे.

फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे पोलिसांच्या ताब्यात

वैष्णवी हगवणे प्रकरणातील  फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे याला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.   संजय हगवणे याने आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. चौकशीसाठी  पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.  दरम्यान वैष्णवीचे बाळ बेकायदेशीर रित्या ठेवल्या प्रकरणी त्याच बरोबर  बाळ न्यायला आलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखविल्या प्रकरणी निलेश चव्हाण विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. वैष्णवीच्या काकांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

आंबोली नंतर भुईबावडा घाटात दरड कोसळली

जिल्ह्यात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी या तालुक्यामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटामध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे काही तास हा घाट बंद झाला होता. दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी व बांधकाम कर्मचाऱ्यांच्या साह्याने सायंकाळी सातच्या सुमारास ही दरड हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला आहे.

विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे उद्धव ठाकरे गटाला करणार जय महाराष्ट्र

- नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का...

- विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे उद्धव ठाकरे गटाला करणार जय महाराष्ट्र ...

 -  शिंदे गटात प्रवेश करणार..

- मुक्तागिरी बंगल्यावर उद्या होणार प्रवेश सोहळा 

- दराडे यांचेसह समर्थक पदाधिकारी व  कार्यकर्तेही  शिंदे गटात सामील होणार

- दराडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

दहशतवादविरोधी मोहीमेत यूएईचा भारताला पूर्ण पाठिंबा

दहशतवादविरोधी मोहीमेत भारताच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण समर्थन देऊ, अशी ग्वाही संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) मंत्र्यांनी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरविषयीची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी अबुधाबी येथे यूएईच्या मंत्र्यांसोबत चर्चा केली.

तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ

राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत, केंद्र सरकारने तूर खरेदी मुदत वाढवून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच छगन भुजबळांचे मतदार संघात आगमन

- कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच छगन भुजबळांचे  मतदार संघात आगमन...

- येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील  विंचूर येथे मंत्री छगन भुजबळांचे जंगी स्वागत...

- फटाक्याची आतिषबाजी, बँडचा गजरात क्रेनच्या साह्याने वीस फुटी हार घालून भुजबळांचे स्वागत...

- मंत्री भुजबळांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची चढावढ...

पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट

पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.  पुढील 3 ते 4 तास पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पुढील काही वेळात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा देखील हवामान खात्याच्या अंदाज आहे. 

सलमान खानच्या घरता अनोळखी इसम घुसला

20 मे ला सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट एका तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केला.  जितेंद्र कुमार सिंह असं त्याचं नाव असून तो छत्तीसगडचा रहिवाशी आहे. मुंबई पोलिसांच्या जवानांनी त्याला पकडले. त्याला अटक केली आहे. तो सकाळी ही आला होता. त्याने त्यावेळीही आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सलमानला भेटायचे होते. 

APMC मध्ये केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापेमारी

नवी मुंबईतील एपीएमसी ड्रायफ्रूट मार्केटमध्ये अक्रोड आयात प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे.

CBIC च्या गुप्तचर विभागाने मागील सात दिवसांपासून सुरू केलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांच्या करचोरीचा संशय स्पष्ट झाला आहे. व्यापाऱ्यांनी इनव्हॉइसमध्ये अक्रोडाची किंमत कृत्रिमरीत्या कमी दाखवून सरकारचा महसूल बुडवला. याशिवाय, व्यवहार हवाला मार्गे केल्याची शक्यता आणि नेपाळमार्गे आयात करून कायदेशीर प्रक्रिया टाळल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्ग : आंबोली घाटात दरड कोसळली, काही काळ वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग : आंबोली घाटात दरड कोसळली.

काही काळ वाहतूक ठप्प.

एकेरी वाहतूक सुरू,  दरड बाजूला करण्याचं काम सुरू.

बीडमध्ये 606 पोलीस अंमलदारांच्या बदल्या; जिल्हा पोलीस दलातील बदल्यांचा मोठा निर्णय

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने एक ऐतिहासिक आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलीस काॅन्स्टेबल ते ग्रेड पोलिस उपनिरीक्षक अशा एकूण 606 पोलिस अंमलदारांची बदली करण्यात आली आहे. हे आतापर्यंतचे बीड जिल्ह्यातील सर्वाधिक बदल्यांचे प्रमाण असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेमध्ये एक नवचैतन्य निर्माण होणार असल्याची शक्यता आहे.

           गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात विविध स्वरूपाचे गुन्हे, चोऱ्या, घरफोड्या, खून, आणि अंमली पदार्थांचे व्यवहार वाढताना दिसत होते. काही भागांमध्ये स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्वही अधिक जाणवत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने जिल्ह्यातील कामगिरी करणाऱ्या अंमलदारांचा आढावा घेऊन, बदल्यांचा निर्णय घेतला आहे.

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे आता 'धाराशिव', केंद्राची मंजुरी

उस्मानाबादचे नाव बदलून जिल्ह्यासह शहराचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. मात्र रेल्वे स्थानकाला जुनेच उस्मानाबाद हे नाव सुरु होते. मात्र राज्य शासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार येथील रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन धाराशिव असे करण्यासंदर्भात प्रक्रिया केंद्राकडून पूर्ण करण्यात आली असल्याने लवकरच आता रेल्वे स्थानकावर धाराशिव रेल्वे स्थानक असा बोर्ड झळकणार आहे.

वैष्णवी हगवणेचं बाळ तिच्या आई-वडिलांकडे सोपवलं

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, वैष्णवीचं बाळ तिच्या आई-वडिलांकडे सोपवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळाला शोधून वैष्णवीच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्याच्या विशेष सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिल्या होत्या. 

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या घरांना फटका

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोगटेवाडी येथील घरांना बसला. सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागला आहे. 

सरन्यायाधीशांच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका, न्यायाधीशांना याचिकाकर्त्यांना झापलं

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती जनहित याचिका.  न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांना झापलं. अनावश्यकपणे लोकप्रियता मिळवण्याचा लोक प्रयत्न का करतात?  माननीय सरन्यायाधीशांनी स्वतः सांगितल आहे की प्रकरण प्रमाणापेक्षा जास्त मोठं केल जातंय. त्यात काही त्रुटी असतील पण अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तुम्हाला वाटते का की या गोष्टीवरून आपण CJI यांची प्रतिष्ठा मोजतो.  ही याचिका बरखास्त करा आणि याचिका कर्त्यांवर दंड लावा, अशा कडक शब्दात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांना झापलं आहे. 

छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरण, जमिनीचे मूल्यांकन 8 ते 10 दिवसांत सुरू होणार

छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाने ज्या गटांमध्ये भूसंपादन करायचं आहे,त्यावर सूचना-हरकती स्वीकारल्या आहेत. आता मालमत्तांच्या मूल्यांकनाला सुरुवात होणार आहे. आठ ते दहा दिवसांत हे काम सुरू होणार आहे.चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या 9 हजार 300 फूट आहे. मोठ्या विमानांसाठी धावपट्टीची लांबी किमान 12 हजार फूट असणं गरजेची आहे. धावपट्टी वाढविण्यासाठी 147 एकर जमीन लागणार आहे.या जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला आता सुरुवात झालीय.

पावसाच्या तडाख्याने ऐतिहासिक फुले वाड्यातील चबुतऱ्यावरील छताचा भाग निखळला

पावसाच्या तडाख्याने ऐतिहासिक फुले वाड्यातील चबुतऱ्यावरील छताचा भाग निखळला. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक फुले वाड्याला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे वाड्याच्या छतावरील कवले आणि लाकडी भाग निखळले आहेत.  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिपूजक चबुतऱ्यावरील छताचा भागही खराब होऊन निखळला आहे.  शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या या वास्तूची झालेली ही दुर्दशा चिंताजनक आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन जतन आणि दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी  नागरिकांमधून होत आहे.

शेअर बाजारात पडझड; निफ्टी 24,700 च्या खाली, आयटी, एफएमसीजीमध्ये मोठी विक्री

शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सकाळी बीएसई सेन्सेक्स 779.34 अंकांनी घसरून 80,817.30 वर पोहोचला. तर निफ्टी देखील 239.05 अंकांनी घसरून 24,574.40 वर व्यवहार करत होता. आयटी, एफएमसीजी शेअर्समध्ये मोठी विक्री दिसत आहे. 

गुंड गजा मारणेला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

गुंड गजा मारणेला न्यायालयाचा दणका, गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. जामीन अर्ज फेटाळत या प्रकरणात मारणेसह दहा साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास न्यायालयाने गुन्हे शाखेला ३० दिवसांची दिली मुदतवाढ.  पण न्यायालयाने गजा मारणे याचा हा अर्ज फेटाळला असून गजा मारणेचा मुक्काम पुन्हा जेलमध्येच असणार.

पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर, MH 60 ही नवीन परिवहन ओळख

पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आहे. शिवाय एमएच ६० ही नवीन परिवहन

ओळख जिल्ह्याला मिळाली असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालघरमधील दुर्गम भागातील नागरिकांना परिवहन विषयक कामासाठी वसई, विरारला हेलपाटे घालावे लागत असत. त्यामुळे पालघर येथे ९ एप्रिल रोजी झालेल्या लोकदरबारामध्ये पालघरमधील नागरिकांसाठी लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता होत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटलंय.

सिंधुदुर्ग मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शिवसेनेचा मदतीचा हात

सिंधुदुर्ग- कुडाळ शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड झाली. जनजीवन विस्कळीत झाले आहे. ही परिस्थिती सावरण्यासाठी ठाकरे सेनेच्या शिव आपात सेनेने कंबर कसली असून मदतकार्य करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे हेल्पलाइनला नागरिकांकडून फोन आल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन शिवसैनिकांनी जेसीबी आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून झाडे तोडून बाजूला केली व नागरिकांसाठी रस्ते खुले केले. त्यांच्या या सहकार्याच्या भावनेमुळे नागरिकांतून समाधानाचे वातावरण आहे.

भारतातील पाकिस्तान हायकमिशनमधील अधिकाऱ्याला 24 तासांत भारत सोडण्याचे आदेश

भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका दिलाय. भारतातील पाकिस्तान हायकमिशन मध्ये काम करणा-या एका अधिका-याला २४ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले. या पाकिस्तानी अधिका-याची संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत. त्यामुळेच भारतानं मोठी कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. 

जिंदाल कंपनीतील आग 30 तासांनंतरही कायम, 3 कामगार जखमी, कोट्यवधींचं नुकसान

नाशिक : जिंदाल कंपनीतील आग जवळपास 30 तासानंतरही धुमसतीच.  मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कच्चा मालाच्या गोदामात भडकली होती आग.  हळूहळू आग कंपनीच्या इतर भागातही पसरली.  24 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू मात्र अजूनही आग आटोक्यात नाही. कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा होतोय भडका. स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात घबराटीचे वातावरण.  घटनेत तीन कर्मचारी जखमी, कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाल्याची भिती. 

पुणे शहरातील नालेसफाईची कामे हातात घ्या, रवींद्र धंगेकरांची पुणे महापालिकेकडे मागणी

पुणे शहरातील नालेसफाईची कामे हातात घ्या. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांची पुणे महापालिकेकडे मागणी. शहरात अवकाळी पावसामुळे सगळीकडे पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  धंगेकर यांनी पाठवले महापालिकेला पत्र. शहरातील पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे करून घेण्याची रवींद्र धंगेकर यांची मागणी.

अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 4 स्थानकांचा पुनर्विकास होणार

देशभरातील एक हजार 300 जुन्या रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधांची झळाळी देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात अमृत भारत स्थानक योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी अमृत भारत योजनेअंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आलेला आहे.  यात मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांचा समावेश आहे. ही स्थानके केवळ 15 महिन्यांत अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकासित करण्यात आली आहेत.  या कामांचा एकूण खर्च 138 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या 12 पैकी 4 स्थानके मुंबई विभागात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे व्हर्च्यूअल उद्घाटन करणार आहे. मुंबई विभागात असलेल्या चिंचपोकळी स्थानकात प्रवाशांच्या सोई वाढविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्य आल्या आहेत. ज्यामुळे दररोज स्थानकावरून प्रवास करणाऱ्या सरासरी ३६,६९६ प्रवाशांना मोठा फायदा होईल.

पुणे शहरात दहा वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद

पुणे शहरात दहा वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. वातावरणातील बदलामुळे शहरात सर्वाधिक पावसांची नोंद झाली आहे.  1 मे ते 21 मे या कालावधीत 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  यापूर्वी मी 2015 मध्ये 106 मिलिमीटर पावसात नोंदवला गेला होता.   मे महिन्यात पुण्यात सरासरी 31.4 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र मंगळवारी आलेल्या पावसाने शंभरी ओलांडली शिवाजीनगर मध्ये 24 तासात 40.5 मिलिमीटर पाऊस पडला चिंचवड मध्ये 101 मिलीमीटर पाऊस पडला.  पुढचे दोन दिवस आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com