धक्कादायक! 'मुलीला वेश्या व्यवसाय करायला सांग अन् लोन फेड' फायनान्स कंपीनीची मुजोरी

फायनान्स कंपनीने मोबाईल ॲपवर कर्ज देऊन एक दिवस कर्ज थकलं म्हणून अश्लील कॉल करण्यात आला.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

खासगी बँका, प्रायव्हेट फायनान्स किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून लोन सहज उपलब्ध होते. मात्र लोन थकलं तर रिकव्हरी एजन्ट्सी अरेरावी टोकाची असते. याआधी असे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. लोनचे हफ्ते थकले म्हणून कर्जदाराला कॉल करुन खालच्या भाषेत अरेरावी केल्याचं उघड झालं आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यात धनंजय खटावकर या 55 वर्षांच्या व्यक्तींने 7 वर्षांपूर्वी घर विकत घेण्यासाठी होम क्रेडीट नावाच्या फायनान्सकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्याची 40 हजार रुपये परतफेड केली आहे . परतफेडीनंतरही 1802 रुपयांचा प्रति महिन्याचा हप्ता भरण्यासाठी मुंबईच्या ऐरोलीतून काही मुली खटावकरांना फोन करतात. 

 

ट्रेंडिंग बातमी - नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

धक्कादायक बाब अशी की खटावकर यांचा फोन हॅक करून त्यातले खटावकर यांच्याशी संबंधित असलेले अनेकांचे नंबर या होम फायनान्सच्या कॉल सेंटरमधल्या मुलींनी मिळवले आहेत. या मुली खटावकरांच्या नातलगांना फोन करून धमक्या देत आहेत. खटावकर यांच्या जावयांना फोनकरून त्यांना पत्नीबद्दल देखील उलट-सुटल भाषेत वाटेल ते सांगितलं. तिने वेश्याव्यवसाय करून पैसे फेडावेत अशा सूचना देखील य रिकव्हरी करणाऱ्या मुलींनी केली. 

धनंजय खटावकरांचे जावई आणि कॉल सेंटरमधून फोन केलेल्या मुली यांची एकमेकांना शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. आपल्यासोबत घडलेला हा प्रकार एनडीटीव्हीला सांगताल खटावकर यांना रडू कोसळलं. खटावकर कुटुंब या फोन कॉलमुळे त्रस्त झाले आहे. खटावकर पोलिसांकडे गेले होते, मात्र पोलिसांनी देखील सहकार्य केले नाही. 

Advertisement