महायुतीत जागावाटपावरुन मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. यावरुन भाजपच्या अनेक नेत्यांना बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने 37 विधानसभा मतदारसंघातील 40 नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली. भाजप पदाधिकारी असूनही पक्षशिस्तीचे उल्लंघन करण्याचे काम केले आहे. अशा कृतीमुळे पक्ष शिस्तीचा भंग होत असून, तुमची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे, असं पत्रक महाराष्ट्र भाजपचे कार्यालयाने प्रसिद्ध केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जालना विधानसभा मतदारसंघातून अशोक पांगारकर, सावंतवाडीतून विशाल परब, जळगाव शहरातून मयूर कापसे, अमरावतीमधून जगदीश गुप्ता, धुळे ग्रामीणमधून श्रीकांत कार्ले यांच्यासह 40 नेत्यांची नावे जाहीर केली. कारले यांनी नुकताच धुळे ग्रामीणमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 4 नोव्हेंबरपर्यंत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी मागे घेण्यासाठी सर्वांना आवाहन केलं होतं. त्याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी उत्तर मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?
भाजपने कुणाची पक्षातून केली हकालपट्टी?
- धुळे ग्रामीण - श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
- जळगांव शहर - मयुर कापसे, आश्विन सोनवणे
- अकोट - गजानन महाले
- वाशिम - नागेश घोपे
- बडनेरा - तुषार भारतीय
- अमरावती - जगदीश गुप्ता
- अचलपूर - प्रमोद सिंह गडरेल
- साकोली - सोमदत्त करंजेकर
- आमगांव- शंकर मडावी
- चंद्रपूर - ब्रिजभूषण पाझारे
- ब्रम्हपूरी - वसंत वरजुरकर
- वरोरा - राजू गायकवाड, अतेशाम अली
- उमरखेड - भाविक भगत, नटवरलाल उंतवल
- नांदेड उत्तर - वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख
- नांदेड दक्षिण- दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे,
- घणसावंगी - सतीश घाटगे
- जालना - अशोग पांगारकर
- गंगापूर- सुरेश सोनावणे
- वैजापूर -एकनाथ जाधव
- मालेगांव बाह्य - कुणाल सूर्यवंशी
- बागलान- आकाश साळुंख, जयश्री गरुड
- नालासोपारा- हरिष भगत
- भिवंडी ग्रामीण- स्नेहा देवेंद्र पाटील
- कल्याण पश्चिम - वरुण सदाशिव पाटील
- मागाठणे - गोपाळ जव्हेरी
- जोगेश्वरी पूर्व- धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर
- अलिबाग - दिलीप भोईर
- नेवासा - बाळासाहेब मुरकुटे
- सोलापूर शहर - उत्तर शोभा बनशेट्टी
- अक्कलकोट - सुनील बंडगर
- श्रीगोंदा -सुवर्णा पाचपुते
- सावंतवाडी - विशाल प्रभाकर परब