जाहिरात

Election Result: तुरुंगातून 'विजयाचा' गुलाल! गँगस्टरचे नातेवाईक आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी विजयी

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी एकीकडे राजकीय सत्तांतराचे चित्र स्पष्ट केले असताना, दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या विजयामुळे खळबळ उडाली आहे. पुणे आणि जालना यांसारख्या शहरांत चक्क तुरुंगात असलेल्या उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Election Result: तुरुंगातून 'विजयाचा' गुलाल! गँगस्टरचे नातेवाईक आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी विजयी

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत यंदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील महिलांपासून ते गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीपर्यंत अनेकांनी तुरुंगात असतानाही विजयाची गुलाल उधळला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी एकीकडे राजकीय सत्तांतराचे चित्र स्पष्ट केले असताना, दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या विजयामुळे खळबळ उडाली आहे. पुणे आणि जालना यांसारख्या शहरांत चक्क तुरुंगात असलेल्या उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुण्यात 'आंदेकर टोळी'चा करिश्मा; दोन महिला उमेदवारांचा विजय

पुण्यातील प्रभाग २३ (नाना पेठ-गणेश पेठ) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कुख्यात गँगस्टर सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे या दोन्ही महिला सध्या तुरुंगात आहेत.

(नक्की वाचा-  TMC Election 2026: ठाण्याचा 'गड' शिंदेंकडेच! महायुतीला निर्विवाद बहुमत; वाचा 131 नगरसेवकांची संपूर्ण यादी)

माजी नगरसेवक स्वर्गीय वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांनी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला. तर लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या ऋतुजा गडाळे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. वनराज आंदेकर यांची १ सप्टेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती, त्यानंतर सूड म्हणून १९ वर्षीय आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी विजयी

जालना महानगरपालिकेत प्रभाग १३ मधून श्रीकांत पांगारकर यांनी विजय मिळवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पांगारकर हे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. पांगारकर यांनी भाजप आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला.

(नक्की वाचा-  Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...)

विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र विरोधानंतर तो प्रवेश स्थगित करण्यात आला होता. अखेर अपक्ष किंवा इतर पाठिंब्याने त्यांनी विजय खेचून आणला. पांगारकर हे २००१ ते २००६ दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक होते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com