Maharashtra Election : महाविकास आघाडीत अजूनही 4 जागांवरुन रस्सीखेच, 'या' जागांवर ठाकरे गट-काँग्रेसचा दावा

Maharashtra Election 2024 : काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत आज 43 जागांवर चर्चा झाली. त्यातील 26 जागांवर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. आता काँग्रेसच्या दिल्लीत निवडणूक समितीची बैठक होणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात अजून रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाने विदर्भातील 8 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर आणखी चार जागांवर ठाकरे गटाकडून दबावाचं राजकारण सुरु आहे. 

काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत आज 43 जागांवर चर्चा झाली. त्यातील 26 जागांवर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. आता काँग्रेसच्या दिल्लीत निवडणूक समितीची बैठक होणार नाही. पुढच्या दोन दिवसात काँग्रेसची ऑनलाईन निवडणूक समितीची बैठक होणार या बैठकीत उर्वरीत जागांवर निर्णय होणार आहे. एकंदरीत काँग्रेसने आतापर्यंत सीइसीच्या बैठकीत 91 जागांवर चर्चा केली आहे. आज शिक्कामोर्तब केलेल्या 25 जागांवर उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद

ठाकरे गटाने दावा केलेल्या चार जागांवर काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीतही चर्चा झाली. यापैकी चंद्रपूरच्या वरोरा भद्रावती जागेवरून काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आपल्या भावाला तिकीट देण्याची मागणी केली आहेत. तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांच्या दिराने तिथून तिकीट मागितले आहे.

उद्धव ठाकरेंचा या जागांवर दावा

  1. भंडारा - शिवसेना ठाकरे गट भंडाऱ्यातून उमेदवारी मागत आहे. शिवसेना ठाकरे गट नरेंद्र पहाडे यांच्यासाठी याठिकाणी प्रयत्न करत आहे. मात्र भंडारा काँग्रेसचा गड असल्याने त्यांचा देखील दावा आहे. मात्र भंडारा काँग्रेसचा गड मानला जातो, त्यामुळे त्यांचाही या जागेवर दावा आहे. काँग्रेस पूजा ठवकर, प्रेम सागर गणवार यांच्या नावाचा विचार करत आहे.
  2. दक्षिम नागपूर - विद्यमान आमदार मोहन मते भाजपचे आहेत. गिरीष पांडव, अतुल लोंढे हे काँग्रेसकडून दावा करत आहेत. तर ठाकरे गटाचाही या जागेवर दावा आहे.
  3. चंद्रपूरमधील दोन जागांवर ठाकरे गटाचा दावा आहे. वरोरा भद्रावतीमधून प्रवीण काकडे, प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ यांना उमेदवारी हवी आहे. तर प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांना सुद्धा उमेदवारी हवी आहे. अनिल धानोरकर नगराध्यक्ष होते. या जागेवर ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे यांनी दावा केला आहे. 
  4. बल्लारपूर - उद्धव ठाकरे यांना ही जागा हवी आहे. संदीप गिऱ्हे ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत.
Topics mentioned in this article