2 days ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एकाच राजकीय मंचावर एकत्र येणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी ही ऐतिहासिक भेट आज पुण्यात होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी हा जाहीरनामा असणार आहे. 
 

Jan 10, 2026 09:29 (IST)

पुणे महानगरपालिका १५० पुणे मॉडेल शाळा उभारण्याचं आश्वासन

पुणे महानगरपालिका १५० पुणे मॉडेल शाळांना मंजुरी देईल, शाळांचे श्रेणीवर्धन करेल आणि लोकसंख्येच्या क्लस्टरनुसार टप्प्याटप्प्याने सीबीएसई आणि आयसीएसई मानकांनुसार नवीन शाळा सुरू करेल.

या शाळांमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा, प्रशिक्षित शिक्षक, मराठीच्या पायाभूत ज्ञानासह इंग्रजी माध्यमाचे शिक्षण, क्रीडा सुविधा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असतील.

कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, प्रभाग निहाय आणि पारदर्शक देखरेख यामुळे महानगरपालिकेच्या खर्चात राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सुनिश्चित होईल, ज्यामुळे महागड्या खाजगी शाळांवरील अवलंबित्व कमी होईल.

Jan 10, 2026 09:24 (IST)

पुण्यासाठी मोफत मेट्रो, मोफत बस सेवेचे दोन्ही राष्ट्रवादीचे आश्वासन

पुणे शहरातील ३३ मिसिंग लिंक आणि १५ मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधार करणार. १५० किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे संपूर्ण शहरात कुठेही जाणे सोपे होईल.

पुढील २ वर्षाच्या कालावधीत खालील कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण करणार

बाणेर-पाषाण लिंक रोड (६ महिन्यात पूर्ण)

कात्रज-कोंढवा रोड (६ महिन्यात पूर्ण)

बालभारती-पौड रोड

लोकमत-सावित्री गार्डन (धायरी) रोड

भुगाव-वारजे-नांदेड सिटी-नन्हे-जांभुळवाडी रोड (PMRDA

इंटरनल रिंग रोड)

वाघोली-लोहगाव लिंक रोड

बकोरी फाटा (वाघोली)-बकोरी रोड

वाघोली-नगर रोड बायपास (३० मी. रुंद)

खाडी मशीन चौक-वडकी रोड (६० मी. रुंद)

VIT कॉलेज-कोंढवा रोड

वाकड-कात्रज सर्विस सर्व्हिस रोड (पुणे-सातारा हायवे)

आयव्ही इस्टेट (Ivy Estate) रोड (वाघोली)

३६ कि. मी. चा हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रोड (HCMTR) (पुणे

शहराचा इंटरनल रिंग रोड)

Jan 10, 2026 09:20 (IST)

Pune News: पाण्यात वितरण व्य़वस्था आणि उंच टाक्या उभारण्याची गरज - अजित पवार

अजित पवार

पुण्यात नवीन गावांमध्ये टँकर माफिया वाढलेत. पाण्यात वितरण व्य़वस्था आणि उंच टाक्या उभारण्याची गरज आहे. आम्ही २०१५ मध्ये २०१८ कोटींची तरतूद केली होती. मात्र त्यात पुढे काही झालं नाही. यामुळे कारण नसताना नागरिकाना त्रास सहन करावा लागत आहे. 

Jan 10, 2026 09:17 (IST)

पुण्याच्या विकासाची अष्टसूत्री

अजित पवार 

इतर तीन कामांवरही लक्ष

  • झोपडपट्टी पुनर्वसन 
  • जुन्या इमारतींचा पुनर्विकास
  • १५० पुणे मॉडेल शाळांचा उभारण करणार

Advertisement
Jan 10, 2026 09:15 (IST)

Pune News: पुण्यात पाच कामांना विशेष प्राधान्य, अजित पवारांची घोषणा

>> अजित पवार

एक अलार्म पाच काम, दोन्ही राष्ट्रवादींनी घोषणा दिली होती. त्याच पाच कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

यात,

  • नळाद्वारे पाणी
  • ट्रॅफिकमधून मुक्ती
  • पु्ण्यात नियमित स्वच्छता
  • हायटेक आरोग्य सुविधा
  • प्रदूषण मुक्त पुणे महापालिका परिसर

Jan 10, 2026 09:07 (IST)

Pune News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादीचा अष्टसूत्रीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Topics mentioned in this article