जाहिरात

Tukaram Mundhe: रुग्णालयांकडून रुग्णाची कशी होतेय लूट? तुकाराम मुंढेंनी उघड केले वैद्यकीय साहित्यांचे दर

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वैद्यकीय साहित्यांच्या किमतींवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालयांमध्ये 6.75 रुपयांची सिरिंंज 257 रुपयांना, तर 11 रुपयांचा आयव्ही सेट थेट 325 रुपयांना विकून रुग्णांची मोठी लूट केली जात असल्याचे एफडीएच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे.

Tukaram Mundhe: रुग्णालयांकडून रुग्णाची कशी होतेय लूट? तुकाराम मुंढेंनी उघड केले वैद्यकीय साहित्यांचे दर

आजारपणाच्या काळात रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मेडिकल बिलांच्या नावाने कशी पिळवणूक केली जाते, याचा खळबळजनक खुलासा महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या मूळ खरेदी किमतीत आणि त्यांच्या छापील किमतीत तब्बल 2800 टक्क्यांहून अधिकचा फरक असल्याचे त्यांनी उघड केले आहे.

तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत हा केवळ पैशांचा प्रश्न नसून सार्वजनिक आरोग्याशी जोडलेला गंभीर मुद्दा असल्याचे स्पष्ट केले.

एफडीए सर्वेक्षणात उघड झालेला किमतींचा फरक

महाराष्ट्र एफडीएने राज्यातील रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे सर्वेक्षण केले असता खालील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

IV इन्फ्यूजन सेट (सलाइन सेट) ज्याची खरेदी किंमत केवळ 11.05 रुपये होती, त्यावर 325 रुपये एमआरपी छापण्यात आली होती. 76.75 रुपयांत उपलब्ध असणाऱ्या सिरिंजची एमआरपी 257.20 रुपये दाखवण्यात आली होती. याशिवाय 29.41 रुपयांच्या मूळ किमतीच्या कॅथेटरवर 310 रुपये एमआरपी लावली गेली होती.

"रुग्ण दरांवर प्रश्न विचारू शकत नाही" - तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांनी नमूद केले की, "उपचार सुरू असताना रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक किमतींची तुलना करू शकत नाहीत किंवा पर्याय निवडू शकत नाहीत. उत्पादक आणि वितरक  संगनमताने वाजवीपेक्षा जास्त एमआरपी छापतात. 'ड्रग्ज ऑर्डर, 2013' अंतर्गत औषधांच्या किमतींवर नियंत्रण असले तरी, मेडिकल उपकरणांवर आणि साहित्यावर कोणतेही स्पष्ट नियमन नाही."

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र एफडीएने केंद्र सरकारच्या 'फार्मास्युटिकल्स विभाग' आणि NPPA (नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी)कडे विशेष शिफारस पाठवली असून, खरेदी किंमत आणि एमआरपीमधील तफावत रोखण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खाद्य सुरक्षा आणि औषध विक्रीच्या विरोधात जोरदार मोहीम राबवत असून, अनेक हॉटेल्स आणि क्लिनिक्सवर धाडी टाकून कडक कारवाई करत आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com