जाहिरात

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत' ला राज्य सरकार देणार 9 कोटी रुपये! काय आहे कारण?

Shah Rukh Khan Mannat : शाहरुख खानला जवळपास 9 कोटी रुपये परत देण्याची मागणी करणारी याचिकेला राज्य सरकार मान्यता देण्याची शक्यता आहे.

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत' ला राज्य सरकार देणार 9 कोटी रुपये! काय आहे कारण?
मुंबई:

Why will Maharashtra Government pay SRK 9 crores :  राज्य सरकार चित्रपट अभिनेता शाहरुख खानला मोठा दिलासा देऊ शकते. शाहरुख खानला (Shah Rukh Khan ) जवळपास 9 कोटी रुपये परत देण्याची मागणी करणारी याचिकेला राज्य सरकार मान्यता देण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीच्या खरेदीसाठी शाहरुख खाननं अतिरिक्त पैसे दिल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या जमिनीवरच शाहरुख खानचं सध्याचं घर 'मन्नत' उभं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात हे घर असून ते शाहरुख आणि त्याची पत्नी गौरीच्या (Gauri Khan) नावावर आहे. राज्य सरकारने पूर्वीच्या मालकाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीवर बांधला आहे. सरकारने या कराराला मंजुरी दिली होती. त्यानंतर मालकाने शाहरुख खानला संबंधित मालमत्ता विकली.

या जमिनिसाठी देण्यात आलेले अतिरिक्त पैेसे परत देण्यात यावे अशी मागणी गौरी खाननं या याचिकेत केलीय. शाहरुख आणि गौरीचं हे घर 2,446 चौरस मीटर परिसरात पसरले आहे. शाहरुख आणि गौरीच्या नावावर ही सर्व प्रॉपर्टी रजिस्टर आहे. भाडेतत्त्वावरील जमिनीवर आधीच्या मालकाकडून मालकी हक्क परत मिळवण्याच्या राज्य सरकारच्या धोरणांचा फायदा घेण्याचा प्रयत्न शाहरुख आणि गौरी करत आहेत, असं मानलं जात आहे. 

Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video

( नक्की वाचा :  Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video )

गौरी आणि शाहरुखने मार्च 2019 मध्ये या घरासाठी रेडी रेकनर किमतीच्या 25 टक्के म्हणजेच 27.50 कोटी रुपये भरले होते. 'फ्री प्रेस जर्नल'नं दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने रूपांतरण शुल्क मोजताना 'अनवधानाने चूक' केली होती हे शाहरुख आणि गौरीला नंतर लक्षात आले. रूपांतरण शुल्क मोजताना जमिनीच्या तुकड्यापेक्षा बंगल्याची किंमत गृहीत धरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या अनावधानानं झालेल्या चुकीसाठी गौरी खाननं सप्टेंबर 2022 मध्ये जिल्हधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. या पत्रात अतिरिक्त पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली होती. ही अतिरिक्त रक्कम 9 कोटी आहे. जिल्हाधिकाऱ्यानं ही मागणी मान्य केली असून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडं पाठवला आहे, अशी माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. राज्य सरकारनं या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर शाहरुखला अतिरिक्त रक्कम परत देण्यात येईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com