Maharashtra Latest News Update : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडताना पाहायला मिळत आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावरुनच नागपूर शहरामध्ये वादाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले असून दोन गटात दगडफेक, जाळपोळीची घटना घडली. यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून परिसरात छावणीचे स्वरुप आले आहे.
नितेश राणे, निलेश राणेंचा बोलवता धनी कोण? - भास्कर जाधव
कोण नितेश राणे? नितेश राणे, निलेश राणेंचा बोलवता धनी कोण? नितेश राणेंच्या मागे एक संघटना आहे. एक व्यक्ती असं करु शकत नाही. यामध्ये संघटना आहे, सरकार आहे. ज्या व्यक्तीची समजात काय पात्रता आहे, काय कुवत आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं.
पूजा खेडकर यांना दिलासा
पूजा खेडकर यांना दिलासा
पूजा खेडकरच्या अटकेवरील अंतरिम स्थगिती न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत वाढवली
सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले
तिला जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा ती उपस्थित असेल
विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन
विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी शिवसेना आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
तर नितेश राणेंवर कारवाईच्या मागणीसाठी विरोधकांचं आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट सरकारलाच सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट सरकारलाच सवाल केला आहे. औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरला आहे आणि दंगल नागपूरला होते. आंदोलन करणाऱ्यांनी कबरीऐवजी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करायला पाहिजे होते. प्रशांत कोरटकरने महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी आंदोलन करणारे कुठे होते? संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडण्यासाठी आंदोलन का केलं नाही? असा सवाल मिटकर यांनी केला.
महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी असे मुद्दे काढले जात आहेत. नागपूरची दंगल ही महाराष्ट्राला परवडणार नाही. एका गटाकडून प्रतिक्रिया आल्यानंतर दुसऱ्या गटाकडून प्रतिक्रिया येणार. महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना अशा दंगली होणे बरोबर नाही. सरकारमध्ये असताना माझा सरकारला सवाल आहे या दंगली का भडकतात. औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राचा आताचा विषय होऊ शकत नाही. नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांना इतिहासाची पुस्तके देणार आहे. हे सांगतात तसं शिवचरित्र असू शकत नाही. या राज्यात सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे, असं देखील मिटकरी यांनी म्हटलं.
कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम जे करतील त्यांना माफ केले जाणार नाही- प्रविण दरेकर
नागपूर घटनेचा निषेध कराव तेवढा कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. हा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम जे करतील त्यांना माफ केले जाणार नाही, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं.
नागपूर हिंसाचार घटनेनंतर पुणे पोलीस देखील सतर्क
नागपूर हिंसाचार घटनेनंतर पुणे पोलीस देखील सतर्क
सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांना सतर्क राहणाच्या सूचना
सर्व पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालण्याच्या सूचना
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज
तणावाची परिस्थती निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिस अलर्ट
नागपूर घटनेनंतर राज्यातील गृह खात्याकडून सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना
पूजा खेडकर यांचे प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी
पूजा खेडकर यांचे प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी
पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर होणार सुनावणी
मागील सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकर यांना दिलासा दिला होता, अटकेपासून संरक्षण दिले होते
कालच दिल्ली सरकारने पूजा खेडकर प्रकरणात रिजॅाईंडर दाखल केले.
पूजा खेडकर यांचे प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी
पूजा खेडकर यांचे प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी
पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर होणार सुनावणी
मागील सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकर यांना दिलासा दिला होता, अटकेपासून संरक्षण दिले होते
कालच दिल्ली सरकारने पूजा खेडकर प्रकरणात रिजॅाईंडर दाखल केले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज प्राथमिक सुनावणी होणार
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्याचे प्रकरण
मुंबई उच्च न्यायालयात आज प्राथमिक सुनावणी होणार असून आज प्रतिवादी पक्षांना नोटीस बजावली जाईल. पुढे सुनावणीसाठी तारीख दिली जाईल, अशी याचिकाकर्ते वकील आशुतोष राठोड यांची माहिती
नाशिक कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या 2 वर्ष शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने 5 मार्चला दिली होती स्थागिती
पुणेकरांना मोठा दिलासा; पुणे शहरातील GBS रुग्णांची रुग्णसंख्या घटली
पुणेकरांना मोठा दिलासा. पुणे शहरातील GBS रुग्णांची रुग्णसंख्या घटली. पुण्यातील GBS चे 80 टक्के रुग्ण झाले बरे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या जीबीएस रुग्णांचा उद्रेक आता मार्च महिन्यात कमी होताना पाहायला मिळत आहे. पुण्यात आतापर्यंत 230 रुग्णांचे निदान झाले असून त्यापैकी 183 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यात सध्या 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर GBS मुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती- विजय वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, नागपूर सारख्या शांत शहरात जाळपोळ झाली, दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे. गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे. त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे. या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे. यासाठी जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांना आवाहन करत आहे की शांतता बाळगावी.
नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबच्या कबर परिसरात पोलीस बंदोवस्तात वाढ
]औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यावेळी काही समाजकंटकांनी जाळपोळ करत पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. नागपुरातील राडा पाहता आज देखील औरंगजेबच्या कबर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबर परिसरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. सोबतच SRPF ची तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरण, नागपूर झोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला
नागपूर हिंसाचार प्रकरण, नागपूर झोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला
दंगलखोरांकडून निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला
निकेतन कदम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु