10 minutes ago

Maharashtra Latest News Update : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडताना पाहायला मिळत आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी  हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावरुनच नागपूर शहरामध्ये वादाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले असून दोन गटात दगडफेक, जाळपोळीची घटना घडली. यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून परिसरात छावणीचे स्वरुप आले आहे. 

Mar 18, 2025 17:24 (IST)

LIVE Update: प्रशांत कोरटकरला मोठा दणका, जामीन अर्ज फेटाळला

प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला 

कोल्हापूर सत्र न्यायालयात आज निकाल

Mar 18, 2025 16:21 (IST)

LIVE Updates: बिग बॉस फेम सूरज चव्हाण खंडेरायाच्या दर्शनाला

बिग बॉस फेम सूरज चव्हाण यानं अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतलंय. यावेळी सूरज सोबत त्याचे सहकारी मित्र आणि श्री मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त देखील उपस्थित होते.सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर रिलीज झाला असून 25 एप्रिल पासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सुरज चव्हाण याचं प्रमोशन करतोय.

Mar 18, 2025 16:18 (IST)

Satara News: भंगार गोडाऊनला भीषण आग, शिरवळ ता. खंडाळा हद्दीतील घटना

सातारा जिल्ह्यातील शिरवळ ता. खंडाळा हद्दीतील घटना

भंगार गोडाऊनला भीषण आग

पळशी - लॉकिम रोडवर भंगाराचे दुकान

आगीचे कारण अस्पष्ट

Mar 18, 2025 15:36 (IST)

Nagpur News: नागपूर हिंसाचाराची आकडेवारी समोर,

सोमवारी नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराची आकडेवारी. 

एकूण काचा फोडण्यात आलेल्या कारची संख्या 30 

जाळण्यात आलेल्या गाड्यांची संख्या  तीन कार दोन क्रेन NCC company  

दोन घरी जाळपोळ करण्यात आली यात घरांसमोर उभ्या असलेल्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. 

या घटनेत एकूण 40 टू व्हीलर फोडण्यात आल्या तर 15 टू व्हीलर जाळण्यात आल्या आहे

Advertisement
Mar 18, 2025 15:23 (IST)

LIVE Updates: दत्ता गाडेच्या वकिलांवर हल्ला

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेचे एक वकील साहील डोंगरे यांच्यावर हल्ला 

काही अज्ञात लोकांनी डोंगरे यांच्यावर हल्ला केल्याचा साहिल डोंगर यांचा आरोप

काल संध्याकाळी हडपसर येथुन डोंगरे यांचे अपहरण करुन बोपदेव घाटात नेण्यात आले

दिवे घाटात त्यांना मारहाण करुन सोडुन देण्यात आले

मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जात दिली तक्रार 

हल्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही

ॲडव्होकेट डोंगरे यांच्यावर ससुन रुग्णालयात करण्यात येत आहेत उपचार

दत्ता गोडेचे वकील वाजीद खान 

यांचे डोंगरे सहायक वकील

Mar 18, 2025 15:21 (IST)

LIVE Updates: हायकोर्टाचा माणिकराव कोकाटेंना दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई हायकोर्टाचा माणिकराव कोकाटेंना  दिलासा

नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब

शासकिय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा प्रकरण

कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला माजी मंत्री तुकाराम  दिघोळे  यांच्या कन्या अंजली राठोड यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे

Advertisement
Mar 18, 2025 15:19 (IST)

LIVE Updates: शॉर्ट सर्किट होऊन 80 एकरातील आंबा जळून खाक

रत्नागिरी तालुक्यातील नेवरे राम रोड येथे एका आंबा व काजूची झाडे असलेल्या बागेला मोठी आग लागली आहे. सध्या हि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुमारे १८०० आंबा कलमे आणि १८०० काजूची कलमे असलेली हि बाग आहे.

याच बागेतून जाणाऱ्या महावितरणच्या लाईनमुळे शॉर्टसर्किट होऊन हि आग लागल्याचे बाग मालकाचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील चार वेळा अशीच आग लागली होती. मात्र अद्यापही नुकसानभरपाई न मिळाल्याचे या बाग मालकाचे म्हणणे आहे. सुमारे शेकडो कलमे जळून खाक झाल्याने या बाग मालकाचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या हि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Mar 18, 2025 14:43 (IST)

LIVE Updates: पोर्शे कार अपघात प्रकरणाची लवकरच सुनावणी

पोर्शे कार अपघात प्रकरणाची लवकरच न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे

या प्रकरणामध्ये सध्या एक प्रकरण बाल न्यायालयामध्ये, तर दुसरे प्रकरण शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू होणार

लवकरच सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी होणार आहे

विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे हे असणार आहेत.

२० मार्च रोजी पोर्शे कार अपघातातले उर्वरीत आरोपींच्या सुनावणी पुणे न्यायालयात होणार आहे 

२२ मार्च ला अल्पवयीन आरोपीच्या अडल्ट ट्राइल वर बाल न्याय हक्क मंडळात होणार सुनावणी 

तर आज मुंबई उच्च न्यायालयात शिवानी अग्रवाल, अजय तावरे, आणि अश्पाख मकानदार आणि अमर गायकवाड यांच्या जामीन अर्जावर दुपारी सुनावणी होणार

Advertisement
Mar 18, 2025 13:12 (IST)

नागपूर हिंसाचाराच्या घटनेत 46 जणांना अटक, पोलिसांची माहिती

नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत नागपूर पोलिसांनी 46 जणांना अटक केली. ल्याची माहिती परिमंडळ दोन चे उपायुक्त राहुल मदने यांनी एनडीटीव्हीला दिली. या हिंसाचारात बाहेरून कोणी लोक आले होते का या संदर्भातील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या 46 लोकांची ओळख पटवली जात आहे. हिंसेच्या वेळी ते कुठे होते त्यांचे मोबाईलचे लोकेशन काय होते, याचाही तपास सध्या घेतला जात आहे. 

Mar 18, 2025 11:19 (IST)

नितेश राणे, निलेश राणेंचा बोलवता धनी कोण? - भास्कर जाधव

कोण नितेश राणे? नितेश राणे, निलेश राणेंचा बोलवता धनी कोण? नितेश राणेंच्या मागे एक संघटना आहे. एक व्यक्ती असं करु शकत नाही. यामध्ये संघटना आहे, सरकार आहे. ज्या व्यक्तीची समजात काय पात्रता आहे, काय कुवत आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं.

Mar 18, 2025 11:08 (IST)

पूजा खेडकर यांना दिलासा

पूजा खेडकर यांना दिलासा

पूजा खेडकरच्या अटकेवरील अंतरिम स्थगिती न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत वाढवली

सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले

तिला जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा ती उपस्थित असेल

Mar 18, 2025 11:00 (IST)

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी शिवसेना आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

तर नितेश राणेंवर कारवाईच्या मागणीसाठी विरोधकांचं आंदोलन

Mar 18, 2025 10:26 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट सरकारलाच सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट सरकारलाच सवाल केला आहे.  औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरला आहे आणि दंगल नागपूरला होते. आंदोलन करणाऱ्यांनी कबरीऐवजी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करायला पाहिजे होते. प्रशांत कोरटकरने महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी आंदोलन करणारे कुठे होते? संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडण्यासाठी आंदोलन का केलं नाही? असा सवाल मिटकर यांनी केला.  

महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी असे मुद्दे काढले जात आहेत. नागपूरची दंगल ही महाराष्ट्राला परवडणार नाही. एका गटाकडून प्रतिक्रिया आल्यानंतर दुसऱ्या गटाकडून प्रतिक्रिया येणार. महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना  अशा दंगली होणे बरोबर नाही. सरकारमध्ये असताना माझा सरकारला सवाल आहे या दंगली का भडकतात. औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राचा आताचा विषय होऊ शकत नाही. नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांना इतिहासाची पुस्तके देणार आहे. हे सांगतात तसं शिवचरित्र असू शकत नाही. या राज्यात सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे, असं देखील मिटकरी यांनी म्हटलं. 

 

Mar 18, 2025 10:19 (IST)

कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम जे करतील त्यांना माफ केले जाणार नाही- प्रविण दरेकर

नागपूर घटनेचा निषेध कराव तेवढा कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. हा पूर्वनियोजित कट असल्याचा अंदाज आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम जे करतील त्यांना माफ केले जाणार नाही, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं. 

Mar 18, 2025 10:08 (IST)

नागपूर हिंसाचार घटनेनंतर पुणे पोलीस देखील सतर्क

नागपूर हिंसाचार घटनेनंतर पुणे पोलीस देखील सतर्क 

सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांना सतर्क राहणाच्या सूचना 

सर्व पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालण्याच्या सूचना 

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज 

तणावाची परिस्थती निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिस अलर्ट 

नागपूर घटनेनंतर राज्यातील गृह खात्याकडून सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

Mar 18, 2025 09:36 (IST)

पूजा खेडकर यांचे प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

पूजा खेडकर यांचे प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी 

पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर होणार सुनावणी

मागील सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकर यांना दिलासा दिला होता, अटकेपासून संरक्षण दिले होते 

कालच दिल्ली सरकारने पूजा खेडकर प्रकरणात रिजॅाईंडर दाखल केले.

Mar 18, 2025 09:36 (IST)

पूजा खेडकर यांचे प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

पूजा खेडकर यांचे प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी 

पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर होणार सुनावणी

मागील सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकर यांना दिलासा दिला होता, अटकेपासून संरक्षण दिले होते 

कालच दिल्ली सरकारने पूजा खेडकर प्रकरणात रिजॅाईंडर दाखल केले.

Mar 18, 2025 09:00 (IST)

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज प्राथमिक सुनावणी होणार

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्याचे प्रकरण 

मुंबई उच्च न्यायालयात आज प्राथमिक सुनावणी होणार असून आज प्रतिवादी पक्षांना नोटीस बजावली जाईल.  पुढे सुनावणीसाठी तारीख दिली जाईल, अशी याचिकाकर्ते वकील आशुतोष राठोड यांची माहिती

नाशिक कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या 2 वर्ष शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने 5 मार्चला दिली होती स्थागिती

Mar 18, 2025 08:53 (IST)

पुणेकरांना मोठा दिलासा; पुणे शहरातील GBS रुग्णांची रुग्णसंख्या घटली

पुणेकरांना मोठा दिलासा. पुणे शहरातील GBS रुग्णांची रुग्णसंख्या घटली.  पुण्यातील GBS चे 80 टक्के रुग्ण झाले बरे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या जीबीएस रुग्णांचा उद्रेक आता मार्च महिन्यात कमी होताना पाहायला मिळत आहे. पुण्यात आतापर्यंत 230 रुग्णांचे निदान झाले असून त्यापैकी 183 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यात सध्या 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  तर GBS मुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mar 18, 2025 07:41 (IST)

या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती- विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, नागपूर सारख्या शांत शहरात जाळपोळ झाली, दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे. गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे. त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे. या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे. यासाठी जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांना आवाहन करत आहे की शांतता बाळगावी.

Mar 18, 2025 07:37 (IST)

नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबच्या कबर परिसरात पोलीस बंदोवस्तात वाढ

 ]औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यावेळी काही समाजकंटकांनी जाळपोळ करत पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. नागपुरातील राडा पाहता आज देखील औरंगजेबच्या कबर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबर परिसरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. सोबतच SRPF ची तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.

Mar 18, 2025 07:34 (IST)

नागपूर हिंसाचार प्रकरण, नागपूर झोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला

नागपूर हिंसाचार प्रकरण, नागपूर झोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला 

दंगलखोरांकडून निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला 

निकेतन कदम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु

Topics mentioned in this article