Maharashtra Election: निवडणूक आयोगाचा एक आदेश; बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची धाकधूक वाढली

Election News Update: निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Mahapalika Election : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत 66 हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत या उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा स्थगित करण्यात आली आहे. या निवडींमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत राज्य निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे.

राजभरातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच जवळपास 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार सत्ताधारी महायुतीचे म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आहेत.

इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर कोणताही दबाव टाकून, आमिष दाखवून किंवा जबरदस्ती करून त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले आहे का, याची तपासणी केली जाईल.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश

निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही आणि अहवाल सादर केला जात नाही, तोपर्यंत संबंधित उमेदवारांना अधिकृतपणे 'विजयी' घोषित करू नका, असे आदेश आयोगाने दिले आहेत. ही चौकशी पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जर चौकशीत काही गैरप्रकार आढळले, तर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Advertisement

(नक्की वाचा- TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)

बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक

पुणे

  • भाजप- 2

पिंपरी चिंचवड

  • भाजप- 2

पनवेल

  • अपक्ष- 1
  • भाजप- 6

ठाणे

  • शिवसेना (शिंदे गट)- 7

भिवंडी

  • भाजप- 6

कल्याण-डोंबिवली

  • भाजप- 14
  • शिवसेना (शिंदे गट)- 6

धुळे

  • भाजप- 4

मालेगाव

  • इस्लामिक पार्टी- 1

जळगाव

  • भाजप- 6
  • शिवसेना (शिंदे गट)- 6

अहिल्यानगर

  • भाजप- 3
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 2

Topics mentioned in this article