जाहिरात

TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच

संतोष तोडकर यांचं शिक्षण कमी असलं तरी त्यांची शिक्षणाप्रतीची आवड त्यांच्या आश्वासनातून दिसून येत आहे. कारण चांगल्या शाळा, विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग, तरुणांसाठी कौशल्य विकासकेंद्रे अशा समाजहिताच्या गोष्टी करण्याची त्यांची इच्छा आहे.

TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच

Thane Mahapalika Election: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून (Affidavit) अनेक रंजक बाबी समोर येत आहेत. प्रभाग क्रमांक 24-ड (विटावा-कळवा) मधून शिवसेना शिंदे गटाकडून संतोष प्रभाकर तोडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विशेष म्हणजे, केवळ 7 वी पास असलेल्या या उमेदवाराकडे कोट्यवधींची संपत्ती असून, नगरसेवक म्हणून निवडून आल्यास त्यांनी आपल्या कामांचा प्राधान्यक्रमही स्पष्ट केला आहे. विटावा-कळवा भागातील संतोष प्रभाकर तोडकर यांच्या अर्जातील माहितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या तोडकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि शिक्षणाचा सविस्तर तपशील दिला आहे.

संतोष तोडकर यांचं शिक्षण कमी असलं तरी त्यांची शिक्षणाप्रतीची आवड त्यांच्या आश्वासनातून दिसून येत आहे. कारण चांगल्या शाळा, विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग, तरुणांसाठी कौशल्य विकासकेंद्रे अशा विद्यार्थी आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी करण्याची त्यांची इच्छा आहे.

संपत्ती आणि शिक्षणाचा तपशील

संतोष तोडकर यांनी 1999 मध्ये विटावा येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 66 मधून इयत्ता 7 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून त्यांची एकूण संपत्ती सुमारे 3 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. त्यांच्याकडे रोकड, बँकेतील ठेवी, एलआयसी पॉलिसी आणि सोन्याचे दागिने आहेत. त्यांच्याकडे कॅनरा बँकेच्या कळवा शाखेत निवडणुकीसाठी स्वतंत्र खातेही आहे.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajingar: "जादूटोण्यामुळेच माझा पराभव झाला!" फुलंब्रीत शिवसेना उमेदवाराचा खळबळजनक आरोप)

तोडकर यांच्याकडे असेलल्या गाड्या?

  • रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड 
  • टोयोटा इनोव्हा
  • टोयोटा फॉर्च्युनर

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

नगरसेवक झाल्यास काय करायचंय?

संतोष तोडकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या कामांचा संकल्प सोडला आहे. 7 वी पास असले तरी त्यांना जमिनीवरील समस्यांची पूर्ण जाण असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

  • शिक्षण व्यवस्थेवर भर: महापालिकेच्या शाळा सुधारल्या जातील, क्रीडांगणे, क्रीडा सुविधा सुधारल्या जातील. विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग तसेच करिअर मार्गदर्शन दिले जाईल.
  • सुरक्षित वातावरण: रहिवाशांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगतशील वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार.
  • स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन: प्रभागातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी नियमित घंटागाडी आणि ड्रेनेज लाईनची दुरुस्ती.
  • आरोग्य सुविधा: गरीब नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे सक्षमीकरण करणे आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे. नियमित आरोग्य शिबीर राबवणार.
  • रस्ते आणि पायाभूत सुविधा: विटाव्यातील अरुंद रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि दिवाबत्तीची सोय करणे.

प्रतिज्ञापत्रानुसार, संतोष तोडकर यांच्यावर कोणताही गंभीर फौजदारी गुन्हा दाखल नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com