CNG Prices Increase : परवडणारा प्रवास महागणार! CNG च्या दरात वाढ; महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची घोषणा

अचानक झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने याबाबत घोषणा केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik News : जागतिक युद्धामुळे देशातील कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान आता सीएनजीच्या दरात तब्बल दोन रुपयांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सीएनजीच्या दरात १.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने याबाबत घोषणा केली आहे. 

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात सीएनजीच्या दरात वाढ...

नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांना आज मध्यरात्रीपासून इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपया ५० पैशांची वाढ जाहीर केली आहे.  नव्या दरानुसार सीएनजीचा किरकोळ विक्री दर ९५ रुपये १५ पैसे प्रतिकिलो इतका झाला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Palghar News : उकाडा जीव घेतोय? बसमध्ये चढण्यापूर्वी भोवळ येऊन महिलेचा जागीच मृत्यू; पालघरमधील हादरवणारी घटना

यापूर्वी नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजीचा दर ९३ रुपये ६५ पैसे प्रतिकिलो होता. मागील काही महिन्यांपासून हा दर स्थिर होता. मात्र नैसर्गिक वायुच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. दरवाढीमुळे खासगी वाहनचालक, रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहतूकदारांच्या खर्चात वाढ होणार असली तरी सीएनजी अजूनही पेट्रोलपेक्षा सुमारे ४४ टक्के आणि डिझेलपेक्षा २० टक्के स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.