IMD Colour Alert Meaning: उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) उष्णतेच्या लाटेबाबत (Heatwave) महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उष्णतेच्या तडाख्यात येणाऱ्या पहिल्या 10 राज्यांपैकी एक असल्याने प्रशासनाने 'राज्य उष्णता कृती आराखडा' अधिक कडक केला आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील 15 जिल्ह्यांना 'हाय रिस्क' झोनमध्ये ठेवण्यात आले आहे.
हवामान विभागाकडून देण्यात येणाऱ्या अलर्ट/रंगाचा अर्थ काय?
हवामान विभाग उष्णतेची तीव्रता दर्शवण्यासाठी तीन रंगांचा वापर करते. या रंगांवरूनच पुढील खबरदारी ठरवली जाते:
1. यलो अलर्ट (पिवळा इशारा): जेव्हा उष्णतेची लाट सलग दोन दिवस टिकते, तेव्हा हा इशारा दिला जातो. याचा अर्थ 'तयारीत राहणे' असा असून उपाययोजना आणि जनजागृतीवर भर दिला जातो.
2. ऑरेंज अलर्ट (केशरी इशारा): उष्णतेची लाट सलग चार दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ राहिल्यास किंवा दोन दिवस तीव्र उष्णता असल्यास हा इशारा मिळतो. यामध्ये सर्व शहरी स्थानिक संस्था, परिषद आणि पंचायत स्तरावर कामगार संरक्षण उपायांची अंमलबजावणी आदेश दिले जातात.
3. रेड अलर्ट (लाल इशारा): जेव्हा तीव्र उष्णतेची लाट दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकते, तेव्हा रेड अलर्ट जारी होतो. हा आपत्कालीन स्तर असून यादरम्यान विनाकारण घराबाहेर पडण्यावर तसेच अनावश्यक बाहेरील कामांवर निर्बंध घातले जातात.
(नक्की वाचा: Heatwave News: सूर्य आग ओकतोय! पुढचे 4 दिवस महत्त्वाचे; मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला IMDचा इशारा)
हे 15 जिल्हे आहेत डेंजर झोन'मध्ये
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील खालील जिल्हे उष्णतेच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखले गेले आहेत:
- खानदेश: जळगाव, नंदुरबार, धुळे
- मराठवाडा: लातूर, नांदेड.
- विदर्भ: अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा
उष्णतेपासून वाचण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळणे आणि सुती कपड्यांचा वापर करणे अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा नियंत्रण कक्ष 1077
रुग्णवाहिका 108
पोलीस हेल्पलाइन 112 / 100
राज्य नियंत्रण कक्ष 1070
राज्य नियंत्रण कक्ष (दूरध्वनी) 022 22027990
सॅटेलाईट फोन नंबर 8991119253
राज्य नियंत्रण कक्ष – ईमेल controlroom@maharashtra.gov.in
नियंत्रण कक्ष नितीन मसळे, कक्ष अधिकारी
नियंत्रण कक्ष श्रीनिवास कोतवाल, उपसचिव (आपत्ती व्यवस्थापन)
एनडीएमए 011-26701728
मंत्रालय पोलीस नियंत्रण कक्ष 022 22023270
हवामान विभाग (आयएमडी) 022 22174720
पोलीस महासंचालक 022 22026636
संचालक, आपत्ती व्यवस्थापन 022 22026868
प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन 022 22024454
एनडीआरएफ पुणे 02114-247000
एसडीआरएफ ठाणे 02562-279434 / 5
एसडीआरएफ नागपूर 7507740400
मुलांसाठी हेल्पलाइन 1098
महिलांसाठी हेल्पलाइन 1091