राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
2018 साली एका छोट्याशा चहा स्टॉलपासून सुरुवात करणाऱ्या येवले ब्रँडच्या (Yewale Amruttulya) नवनाथ येवले यांनी पुण्यातल्या कोंढव्यात साडेपाच कोटी रुपये खर्च करून साडे सहा हजार स्क्वेअर फुटाचं स्वतःचं एक कॉर्पोरेट ऑफिस उभं केलं आहे. एका महिन्यापुर्वी सूरू झालेले सातव्या मजल्यावरील ते ॲाफिस, तिथलं कल्चर, तिथे ठेवलेल्या वस्तू आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय कसा करावा हे आज आम्ही नवनाथ येवले स्वत: सांगणार आहेत. चार येवले बंधूंचा हा व्यवसाय आता बारा राज्यांमध्ये पसरला आहे. 50 कोटी रुपयांचा हा व्यवसाय झालाय. दर महिन्याला दीड कोटी कप चहा येवले बंधूच्या (Yewale Bandhu) स्टॉलमधून लोक पितात. एका चहावाल्याची आश्चर्यचकीत करणारी गगनभरारी कशी होती, NDTV ने घेतला त्याचा धांडोळा...
पुण्यातल्या कोंढव्यात साडेपाच कोटी रुपये खर्च करून जुलै महिन्यात येवलं बंधुनी कार्पोरेट ऑफिस उभं केलं आहे. सातव्या मजल्यावरच्या या ऑफिसमध्ये कुठल्याही ख्यातीकीर्त कंपनीसारखे व्यवसायाचे गरजेनुसार वेगवेगळे कप्पे केलेत. चार येवले बंधू आपल्या पन्नासहून अधिक सहकाऱ्यांसह सकाळी 8 ते रात्री 8 काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा ब्रांझमधील पुतळा. नवनाथ येवले यांच्या टेबलावरील सोनेरी सिंह...शाबासकीच्या पदकांनी सजलेले कपाट... असं नवनाथ येवलेंचे कॅबिन. आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून 2040 पर्यंत देशभरामध्ये येवले ब्रँडचे चाळीस हजार आउटलेट असावेत असा नवनाथांचा प्लॅन आहे.
दहावी पास नवनाथ येवले या ब्रँडचे प्रमुख. चार येवले बंधूंचा हा व्यवसाय आता बारा राज्यांमध्ये पसरला आहे. 50 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. दर महिन्याला दीड कोटी कप चहा येवले बंधूच्या स्टॉलमधून लोक पितात. चार येवले बंधुंनी मिळून या साडे सहा हजार स्क्वेअर फुटाच्या ऑफिसची संकल्पना का मांडली त्याचं ही एक गणित आहे. येवले बंधुंना हे यश सहजासहजी मिळालेले नाही. याच्या आधी नवनाथ यांनी 32 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय केले होते. बहुतेक व्यवसायामध्ये अपयश आलं. चहाचा व्यवसाय पिढीजात. तोच पुढं यशस्वी ठरला.
नक्की वाचा - मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral

येवल्यांच्या गगन भरारीत अडथळ्यांची शर्यत आहेच. वेगवेगळ्या कारणामुळे येवले बंधुंचे दहा टक्के आउटलेट्स आजही बंद पडतात. पण हा असा व्यवसाय आहे की एकदा तुम्ही तीन लाख रुपये देऊन येवले ब्रँड घेतला की मग पुन्हा तुम्हाला कोणतेही कमिशन येवलेंना देण्याची गरज नाही. दहा रुपयाच्या कपामागं विक्रेत्याला तीन रुपये उरतात.
येवले बंधुंचा ब्रँड यशस्वी होण्यामागे काय आहे कारण?
आजही दहा रुपयांमध्ये मिळणारा चहा आणि इतर वस्तूची किंमत सुद्धा वीस रुपयाच्या आत आहे. हे कारण असलं तरी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. येवलेंच्या स्टॉलवर स्वच्छता असते. चहाची किटली हातात घेतलेल्या या काकांना सुद्धा विशिष्ट पद्धतीने डिझाईन केलं गेलं आहे. अंगात पांढराशुभ्र कपडा डोक्यावरती खादीची टोपी आणि चेहऱ्यावरचे हास्य तेच या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पाहायला मिळतं. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असं म्हणणाऱ्यांना येवलेंच्या वाढत्या व्यवसायाने योग्य ते प्रत्युत्तर मिळालं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world