जाहिरात

मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral 

ते एकमेकांकडे न पाहता काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी मनू भाकरची आई दोघांचा एकत्र फोटो काढण्यासाठी पुढे येते.

मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral 
नवी दिल्ली:

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सहा पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. यामध्ये मनू भाकरने दोन कांस्य पदक तर नीरज चोप्राने एक रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यांच्या या यशाचं मोठं कौतुक केलं जात आहे.

देशभरात त्यांनी केलेल्या कामगिरीची चर्चा सुरू आहे. दरम्यान मनू भाकर आणि नीरज चोप्राचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याशिवाय मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांच्यामधील संभाषणाच्या व्हिडिओची मोठी चर्चा सुरू आहे. या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस सुरू झाला आहे. 

वन इंडिया हिंदीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मनू भाकर हिची आई आणि नीरज चोप्रा एकमेकांशी बोलत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे मनूच्या आईने नीरजचा हात डोक्यावर घेत त्याच्याकडून वचन मागितलं आहे. बाहेर आवाज जास्त असल्याने दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलेलं नाही.

Latest and Breaking News on NDTV

मात्र यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. चाहत्यांनी तर मनू भाकरला नीरज चोप्रा आवडत असल्याचंही म्हटलं आहे. एका चाहत्याने तर मनू भाकरची आई जावयाचा शोध घेत असल्याचंही म्हटलं आहे. तर एकाने मनू भाकरच्या आईला मुलगा पसंत असल्याचं म्हटलं आहे. 

त्याशिवाय नीरज चोप्रा आणि मनू भाकरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात एकमेकांसमोर उभं राहून ते काहीतरी बोलत असताना दिसत आहे.

ते एकमेकांकडे न पाहता काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी मनू भाकरची आई दोघांचा एकत्र फोटो काढण्यासाठी पुढे येते. यावेळी मनू भाकर फोटो नको असं म्हणत पुढे जाते. या व्हिडिओवरही अनेकांनी प्रेमाची पहिली पायरी अशीच असल्याचं म्हटलं आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Only Fan Page मुळे चर्चा, मेडल जिंकताच Video व्हायरल! कोण आहे ती खेळाडू?
मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral 
with just 6 medals Paris Olympics turns out to be worst for India what are challenges ahead next Olympic
Next Article
BLOG : पॅरिसच्या 6 पदकांनी करुन दिली खडतर भविष्याची जाणीव