महाराष्ट्रात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, CM फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती

Pradhan Mantri Awas Yojana News: महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न... काय आहे प्लान?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pradhan Mantri Awas Yojana News: एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावे -CM"

Pradhan Mantri Awas Yojana News:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (26 एप्रिल) पुण्यातील यशदा 'ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा' या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. तसेच एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोजगाराचीही संधी निर्माण होईल : CM फडणवीस

"उत्तम प्रशासनासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा, तंत्रज्ञान समजून घेत त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा, इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुसरण करावे",असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. "प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर वीजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

(नक्की वाचा: 'फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री', 'त्या' चर्चेला शिंदेंकडून एका वाक्यात उत्तर, टेन्शन वाढणार!)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील. 12,500 कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: BJP vs MNS : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी! भाजपानं झटकले 'हात' BMC मध्ये काय घडलं?)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे. आगामी 5 वर्षांमध्ये आपल्याला नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक 5 किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल"

Advertisement

महिलांच्या सक्षमीकरणाबाबत काय म्हणाले CM?

"शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे. 'लखपती दीदी'सारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.