महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 2024 इयत्ता 1 ली ते 5 वी व इयत्ता 6 वी ते 8 वीचा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहाता येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोन्ही परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक 31 जानेवारी 2025 पासून संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवारांच्या लॉगीन मधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल. मात्र अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.असं परिषदेने स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन 6 फेब्रुवारी पर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेल वर पाठवावे. असं आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे याबाबतची सर्व माहिती श्रीमती ओक यांनी दिली आहे. त्यामुळे 6 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना आपले निवेदन ऑनलाईन देता येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world