जाहिरात

बांगलादेशात 'परिवर्तनाची' लाट! BNP चे तारिक रहमान होणार नवे पंतप्रधान; भारतासाठी निवडणूक का महत्त्वाची?

Bangladesh Election 2026 Results: बांगलादेशातील 13 व्या संसदीय निवडणुकीत बीएनपीने १९७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले असून ते देशाचे पुढील पंतप्रधान होण्याच्या मार्गावर आहेत.

बांगलादेशात 'परिवर्तनाची' लाट! BNP चे तारिक रहमान होणार नवे पंतप्रधान; भारतासाठी निवडणूक का महत्त्वाची?

बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (BNP) कौल दिला आहे. 300 सदस्यीय संसदेत बीएनपीने 151 जागांचा बहुमताचा आकडा सहज ओलांडत आतापर्यंत 197 जागांवर विजय मिळवला आहे. ही निवडणूक बांगलादेशच्या लोकशाही पुनर्स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

तारिक रहमान यांचा दुहेरी विजय

माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र आणि बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

ढाका 17 या मतदारसंघातून त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. बोगुरा-6 या परंपरागत बालेकिल्ल्यातही त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. तारिक रहमान हे आता बांगलादेशचे पुढील पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)

'जमात-ए-इस्लामी'ची स्थिती

एकेकाळी बीएनपीची सहयोगी असलेल्या पण आता स्वतंत्र लढणाऱ्या 'जमात-ए-इस्लामी'ला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. जमातचे अध्यक्ष शफीकुर रहमान यांनी ढाका-15 मधून विजय मिळवला असला, तरी त्यांच्या पक्षाला केवळ 63 जागांवर समाधान मानावे लागले आहे. जमातचे महासचिव मिया गोलाम पोर्वार यांना बीएनपीच्या उमेदवाराकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Death: पटेल, तटकरे, अरोरा... रोहित पवार नाव न घेता स्पष्टच बोलले, नव्या दाव्यांनी खळबळ)

भारतासाठी ही निवडणूक का महत्त्वाची?

बांगलादेश हा भारताचा महत्त्वाचा शेजारी देश असून 4000 किमीची सीमा सामायिक करतो. बीएनपीच्या सत्तेतील पुनरागमनामुळे भारतापुढील काही आव्हाने आणि संधी असतील.

घुसखोरी, ड्रग्ज तस्करी आणि दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन सरकारसोबत समन्वय साधणे भारतासाठी गरजेचे असेल.
शेख हसीना यांच्या काळात भारत-बांगलादेश व्यापारात मोठी वाढ झाली होती. ती गती कायम राखण्याचे आव्हान तारिक रहमान सरकारसमोर असेल.
'जमात-ए-इस्लामी'सारख्या कट्टरपंथी संघटनांच्या प्रभावावर नियंत्रण मिळवणे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com