जाहिरात

Rajpal Yadav: जेलमध्ये जाण्यापूर्वी ना रडला ना विनवणी केली, राजपाल यादवाच्या भावाने केला मोठा खुलासा Exclusive

Rajpal Yadav Bail Hearing: NDTVने राजपाल यादवचे भाऊ श्रीपाल यादव यांच्याशी खास संवाद साधला. यादरम्यान श्रीपाल यांनी राजपालच्या चित्रपटाबाबत अनेक तपशील उघड केले आणि तुरुंगात जाण्यापूर्वी अभिनेत्याने त्यांना फोन केल्याचेही त्यांनी म्हटलंय.

Rajpal Yadav: जेलमध्ये जाण्यापूर्वी ना रडला ना विनवणी केली, राजपाल यादवाच्या भावाने केला मोठा खुलासा Exclusive
"Rajpal Yadav Bail Hearing: राजपाल यादवच्या भावाचा धक्कादायक खुलासा"
Rajpal Yadav Instagram

- प्रशांत शिशौदिया, प्रतिनिधी
Rajpal Yadav Bail Hearing:
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव 9 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक वाद प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. 5 फेब्रुवारी रोजी त्यानं न्यायालयाच्या आदेशानुसार आत्मसमर्पण केले. त्यानंतर सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की राजपाल यादवनं म्हटले होते, "ना माझ्याकडे पैसे आहेत आणि ना माझे मित्र आहेत." यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे त्याच्या मदतीसाठी पुढे आले आणि फिल्म असोसिएशन FWICEनेही फिल्म इंडस्ट्रीला राजपाल यादवला मदत करण्याचे आवाहन केले. NDTV ने राजपाल यादवचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांच्याशी खास बातचीत करून सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्या कितपत सत्य आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे | Rajpal Yadav News

प्रश्न: श्रीपालजी, सर्वप्रथम मी आपल्याला विचारू इच्छितो की ज्या बातम्या येत आहेत की राजपाल यादव जेलमध्ये जाताना रडत होता आणि म्हणत होता की त्याचे कोणी मित्र नाहीत आणि त्याच्याकडे पैसे नाहीत, या गोष्टी कितपत खऱ्या आहेत?

उत्तर: आमच्या अनुभवावरून आम्ही सांगू शकतो की या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत. तो माझा धाकटा भाऊ आहे. आम्ही एकत्र शिकलो, एकाच खोलीत राहिलो, एकाच बिछान्यावर झोपलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की कितीही मोठी अडचण आली तरी तो कोणासमोर गयावया करणार नाही किंवा रडणार नाही आणि अशा प्रकारच्या गोष्टी तर नक्कीच बोलणार नाही. जाण्यापूर्वी त्याने मला फोन करून सांगितले होते,"दादा, कोणतीही चिंता करू नको" त्यानं आम्हाला खात्री दिली की पैसे कर्ज म्हणून घेतले नव्हते, तर गुंतवणूक म्हणून दिले गेले होते.

त्याने काही कागदपत्रांवर सही केली होती, ज्याबाबत आम्हाला सांगण्यात आले होते की ती कागदपत्रे गुंतवणुकीशी संबंधित आहेत. नंतर जेव्हा चित्रपट पुढे जाऊ शकला नाही, तेव्हा त्या कागदपत्रांच्या आधारे त्याला कर्ज म्हणून दाखवण्यात आले आणि परतफेडीची मागणी सुरू झाली. आम्ही चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये संबंधित व्यक्तीचे नाव निर्माता म्हणूनही पाहिलंय. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जे बोलले जात आहे की तो रडत होता किंवा म्हणत होते की त्याचे कोणी नाही- आम्ही मानू शकत नाही की त्यानं असे काही म्हटले असेल.

(नक्की वाचा: Rajpal Yadav Case: राजपाल यादवचे पूर्ण नाव काय? एकूण संपत्ती किती, लग्न किती केली? वाचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर)

प्रश्न: जेलमध्ये जाताना तुमचे त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं, तेव्हा त्याने काय सांगितले?

उत्तर: त्यानं सांगितलं की, न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याला एक दिवसासाठी जावे लागेल आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. त्याने आम्हाला पूर्ण विश्वास दिला की, "दादा, कोणतीही गोष्ट चिंता करण्यासारखी नाही. आम्ही सिद्ध करू की पैसे गुंतवणुकीसाठी होते, कर्ज घेतलेले नव्हते." आम्हाला चित्रपटसृष्टीबद्दल फार माहिती नाही, पण आम्हाला सांगण्यात आले की चित्रपटांमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे.

प्रश्न: मोठ्या भावाच्या नात्याने सध्या तुमच्या मनात काय सुरू आहे?

उत्तर: माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे की तो उद्या बाहेर येईल. आमच्या मुलीचे लग्न आहे आणि त्याची पूर्ण तयारी सुरू आहे. कोणीतरी पत्रकार आला आणि म्हणाला की घरात नैराश्य पसरलंय. अरे जिथे 50-50 कामगार काम करत आहेत आणि आम्ही सर्व त्यात गुंतलोय. दुपारची वेळ होती, काम करणारे लोक जेवत असतील आणि घरी कोणी दिसलं नसेल तर त्याने फोटो काढून टाकला असेल की इथे नैराश्य पसरलंय वगैरे.

कोणत्याही प्रकारे नैराश्य पसरलेले नाही. आम्ही पूर्ण धैर्याने काम करत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे की तो उद्या बाहेर येईल आणि आम्ही लग्नसोहळा जल्लोषात साजरा करू. लग्न होणारच, कोणतीही अडचण नाही. एवढे मात्र नक्की की कारण तोच मुख्य आकर्षण आहे, त्यामुळे लग्नात त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की तो लवकर बाहेर येवो.

19 फेब्रुवारीला राजपाल यादवच्या पुतणीचे लग्न आहे आणि कुटुंबाला पूर्ण आशा आहे की तो लग्नसमारंभात नक्की सहभागी होतील. तसेच चित्रपटसृष्टीनेही राजपाल यादवला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतलाय.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com