रिझवान शेख, ठाणे
ठाण्यातील मुंब्रा येथे स्कूटर चालकाने धावत्या वाहनावर उभे राहून दुसऱ्या दुचाकीस्वारांना लाथा मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आहे. एम एम वाली या ठिकाणी एक तरुण दुचाकीवरून जात असताना मागून येणारा एक दुचाकीस्वार त्या तरुणाला लाथ मारून पाडण्याचा प्रयत्न करत होता. राऊंडवर असलेल्या पोलिसांना हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी तातडीने या दुचाकीस्वाराला बाजूला घेतले अन् योग्य ती कारवाई केली. यानंतर या तरुणाने हात जोडून माफी देखील मागितली.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुण एकटा स्कुटर चालवत असताना, स्कुटरवर उभा राहून जवळून जाणाऱ्या दोन तरुणांना लाथ मारण्याचा प्रयत्न करतो.
𝕄𝕌𝕄𝔹ℝ𝔸 | A video showcasing a young man performing perilous bike stunts on a public road in Mumbra went viral on social media, sparking widespread concern. The Mumbra Police swiftly identified the individual as Mohammad Shaikh within two hours and took stringent action… pic.twitter.com/pcdLl4ZFIb
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) November 3, 2025
(नक्की वाचा- Bhandara News: भंडाऱ्यात सुशिक्षित कॉलनीत रस्त्यावर काळ्या जादूचा प्रकार! परिसरात भीतीचे वातावरण)
पहिला प्रयत्न करताना तो तरुण थोडक्यात स्कुटरवरून पडताना वाचतो. यानंतर तो दुसरा प्रयत्न करतो आणि एका पायाने दुसऱ्या स्कुटरस्वाराला लाथ मारून त्याची स्कुटर पाडण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावर 'रोड रॅश' गेमप्रमाणे खेळला गेलेला हा स्टंट अत्यंत धोकादायक होता आणि या स्टंटमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
पोलिसांनी जागीच पकडले
हा स्टंट करणाऱ्या तरुणाला याची कल्पना नव्हती की, स्थानिक पोलीस अधिकारी गस्तीवर होते आणि ते त्याच्या अगदी मागे होते. पोलिसांनी हा स्टंट पाहताच त्याला जागीच अडवले आणि त्याला पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला त्याची चूक मान्य करायला लावली.
त्यानंतर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो तरुण हात जोडून आपली चूक मान्य करताना दिसतो. तो म्हणतो की, त्याने स्टंट केला ही त्याची चूक आहे. इतरांना त्याने हळू गाडी चालवण्याचा सल्ला देखील दिला. तसेच, असे स्टंट केल्यास पोलीस कारवाई करू शकतात, असा इशाराही त्याने दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world