महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींना अपक्ष आणि लहान पक्षांची गरज लागण्याची शक्यता आहे. अशावेळी इतर पक्षांची साथ ज्यांना मिळेल त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग सोपा होऊ शकतो. निकालाच्या एकदिवस आधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.
(नक्की वाचा- निवडणुकीच्या निकालानंतर 48 तास का महत्त्वाचे? कशी असेल सत्ता स्थापनेची प्रक्रिया?)
शनिवारी राज्यात मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या वेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्तेत जाणार असे म्हटले आहे.
(नक्की वाचा- - सट्टाबाजारात आघाडी की महायुती? एक्झिट पोलनंतर सट्टाबाजाराचा अंदाज काय?)
महाविकास आघाडी की महायुती कुणासोबत जाणार? याबाबत 'एनडीटीव्ही मराठी'ने प्रकाश आंबेडकर यांना विचारणा केली असता, याबाबत त्यांनी तुर्तास बोलण्यास नकार दिला आहे. अशारितीने प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.