Pune News : ऐन पावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावलं आहे. पुणे शहरात 3 जुलै रोजी मोठी पाणीकपात होणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शहरातील अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तर शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी आहे. प्रामुख्याने कात्रज परिसरात ही पाणीकपात करण्यात येणार आहे.
3 जुलै रोजी या ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद
दत्त नगर, टेल्को कॉलनी, आमराई (आंबेगाव बुद्रुक), दळवी नगर, वाघजाई नगर, अचल फार्म परिसर, पंचम नगर, वडार वस्ती आणि आजूबाजूचा परिसर, संतोष नगर, अंजली नगर, महावीर कुंज, वंडर सिटी, सेक्शन सोसायटी क्षेत्र, गुरुद्वारा परिसर, आंबेगाव खुर्द गाव, आणि जांभूळवाडी रोड आणि आजूबाजूचा परिसर याठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.