जाहिरात

Crime news: बीडमध्ये चाललंय तरी काय? आता महिला सरपंचाकडेच....

या प्रकरणी आता या महिला सरपंचाने थेट पोलिस स्थानक गाठत, या तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Crime news: बीडमध्ये चाललंय तरी काय? आता महिला सरपंचाकडेच....
बीड:

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा संपुर्ण देशात झाली. त्यानंतर एका मागून एक प्रकरणही बाहेर येवू लागली. बीड आहे की बिहार असं ही बोललं जावू लागलं. अपहरण, खंडणी, खून, धमक्या हे या जिल्ह्याची जणू ओळख झाली. हवेत गोळीबाराचे प्रकार तर अनेक ठिकाणी घडले. अशा स्थिती कायदा आणि सुव्यवस्था बीडमध्ये आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला. एखाद्या जिल्ह्यात इतकी गुंडगिरी कशी असू शकते याचीही चर्चा रंगू लागली. त्यानंतर तरी बीडमधले चित्र बदलेल असं वाटत होतं. पण बदलेले ते बीड कसलं असचं म्हणालं लागेत. कारण बीडच्या ममदापूर पाटोदा गावातला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर पाटोदा हे गाव आहे. या गावच्या सरपंच या महिला आहेत. गावाच्या विकासासाठी त्या वेगवेगळ्या योजना गावात राबवत असतात. गावाला विकास निधी आला होता. याची माहिती गावातल्या वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांना मिळाली होती. निधी आल्यानंतर गावात विकास कामे सुरू झाली होती. मात्र हे तिघे ही ममदापूर पाटोदा गावातल्या विकास कामात अडथळे आणत होते. 

ट्रेंडिंग बातमी - Saif Ali khan:'कुर्ता रक्ताने माखलेला, सोबत छोटा मुलगा', सैफ ज्या रिक्षात बसला त्या रिक्षाचालकानं सर्व थरार सांगितला

त्यानंतर तिघांनी तर कहर केला. थेट या महिला सरपंचाला गाठलं. त्यांना जो विकास निधी गावासाठी आला आहे त्यातील आम्हाला एक लाख रुपये द्या अशी मागणी त्यांच्याकडे केली. त्यानंतर गावातल्या विकास कामात काही अडथळा येणार नाही असं ही त्यांनी त्या महिला सरपंचाला सांगितलं. गावातल्या लोकांनी थेट गावच्या सरपंचाकडेच खंडणी मागितल्याचा हा प्रकार घडला. त्यामुळे त्या महिला सरपंच हादरून गेल्या. 

ट्रेंडिंग बातमी - Kalyan Crime : विशाल गवळीचा फास आणखी आवळला, 3 भावांवर पोलिसांची मोठी कारवाई

या प्रकरणी आता या महिला सरपंचाने थेट पोलिस स्थानक गाठत, या तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत. एकीकडे बीड गुन्हेगारीमुळे बदनाम होत आहे. त्यात अशा घटना समोर येत असल्याने त्यात आणखी भर पडत आहे. त्यामुळे या घटनांना पायबंद कधी बसणार अशी विचारणाच सर्व सामान्य बीड जिल्ह्यातील नागरिक करत आहेत.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com