नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री जम्मूमध्ये लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला झाला. जम्मूतील 'ग्रेटर कैलास' परिसरातील रॉयल पार्क येथे हा प्रकार घडला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले असून, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या कमांडोंनी दाखवलेल्या तत्परतेमुळे फारुख अब्दुल्ला यांचे प्राण वाचले आहेत.
काय घडला नेमका प्रकार?
फारुख अब्दुल्ला लग्नसमारंभ आटोपून बाहेर पडत असताना ही घटना घडली. हल्लेखोर अब्दुल्ला यांच्या मागेच होता. त्याने अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तूल ताणले आणि गोळी झाडली. गोळी झाडली जात असतानाच एनएसजी कमांडोंनी हल्लेखोराला जोराचा धक्का दिला, ज्यामुळे गोळीचा निशाणा चुकला आणि अब्दुल्ला थोडक्यात बचावले.
Allah is kind. My father had a very close shave. The details are sketchy at the moment but what is known is that a man with a loaded pistol was able to get within point blank range & discharge a shot. It was only the close protection team that deflected the shot & ensured that… https://t.co/hYBe64Eigl
— Omar Abdullah (@OmarAbdullah) March 11, 2026
(नक्की वाचा- Weather Forecast: मान्सूनवर 'अल निनो'चे सावट! तापमानात 5-7 अंशांनी वाढ होण्याचा 'IMD'चा इशारा)
हल्लेखोर 20 वर्षांपासून संधी शोधत होता
हल्लेखोराला घटनास्थळी उपस्थित लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्लेखोराचे नाव कमल सिंग जमवाल (65 वर्ष) असून तो जम्मूच्या पुरानी मंडी येथील रहिवासी आहे. अटक झाल्यानंतर हल्लेखोराच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. "मी गेल्या 20 वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो," असे त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते.
ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली चिंता
राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 'X' वर पोस्ट करून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "माझ्या वडिलांना झेड प्लस सुरक्षा असूनही हल्लेखोर इतक्या जवळ कसा पोहोचला? हा सुरक्षेतील मोठा दोष आहे," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "अल्लाह दयाळू आहे, माझे वडील थोडक्यात वाचले. सुरक्षा पथकाने वेळीच दखल घेतल्यामुळेच हा प्रयत्न फसला," असेही त्यांनी नमूद केले.
(नक्की वाचा- HDFC Bank: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! कर्ज, पण एटीएम व्यवहारांच्या नियमात बदल)
घटनास्थळी महत्त्वाचे नेते उपस्थित
हल्ल्याच्या वेळी फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नासिर अस्लम वानी उपस्थित होते. या घटनेनंतर जम्मूत तणावाचे वातावरण असून सुरक्षा यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world