Pune News : केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तावर पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत एकाकडे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस सापडली आहे. वारजे भागात पोलिसांच्या तपासणीत एकाला अटक करण्यात आली आहे.
सागर मुंडे असं या २१ वर्षीय आरोपीचं नाव आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. न्यायालयाने देखील सागर मुंडे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कसा असेल अमित शाह यांचा दौरा?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. रात्री मुक्काम केल्यानंतर आज सकाळपासून ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यांच्यासोबत सर्वच कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११.३० वाजता बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पुणे एनडीएमध्ये पार पडणार आहे.
(ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यात मुंबईप्रमाणे लोकलसेवा सुरू होणार? विधानसभेत सरकारचं उत्तर काय?)
त्यानंतर स्पोर्ट्स अँड कन्वेंशन सेंटरचे दुपारी १२.३५ वाजता कोंढव्यातील पीजीकेएम स्कूलमध्ये उद्घाटन करणार आहेत. तसेच दुपारी २ वाजून २० मिनिटांनी अमित शाह कोंढव्याच्या खडीमशीन चौकातील बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी करतील. दुपारी ३ वाजता PHRC या हेल्थ सिटीचे उद्घाटनही अमित शाहांचे हस्ते होणार आहे.