Pune News : हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक

Pune News : सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत. अधिक तपशील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

Pune News : हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली.

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव कुमार याच्या संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला अडवण्यात आले. सखोल पडताळणी आणि निगराणीच्या प्रक्रियेनंतर, दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने 18 मे रोजी रात्री पुणे शहरातील खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले.

(नक्की वाचा- अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार जगबुडी नदीपात्रात बुडाली, 5 जणांचा मृत्यू)

शोध मोहिमेदरम्यान, आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले. ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

(नक्की वाचा-  मुंबईत 2 कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू; इतर गंभीर आजार असल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट)

पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 168 अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत. अधिक तपशील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Topics mentioned in this article