Pune News : मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला, पुण्यात घडली लव्ह अफेअरची खतरनाक घटना, CCTV व्हायरल झाल्याने खळबळ

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Crime News Today Video

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मोटारसायकलला कारने धडक देऊन त्यानंतर हॉकी स्टिक,लोखंडी पाइप आणि दांडक्यांनी मारहाण करण्यात आली या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून मंचर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,यवराज अशोक निघोट (वय २७, रा. मोरडेवाडी, ता. आंबेगाव) यांनी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी तेजस्विनी सोनार यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता.हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता.याच रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

हॉकी स्टिक,लोखंडी पाइप आणि दांडक्यांनी बेदम मारहाण

शनिवारी दुपारी युवराज निघोट हे मित्रासोबत मोटारसायकलवरून जात असताना समोरून आलेल्या ब्रेझा कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.धडकेनंतर जीव वाचवण्यासाठी त्यांनी धाव घेतली.मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग करून हॉकी स्टिक,लोखंडी पाइप आणि दांडक्यांनी बेदम मारहाण केली.नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

नक्की वाचा >> FIFA Word Cup Final : लिओनेल मेस्सीनं चाहत्यांना केलं भावुक, मेस्सीचा शेवटचा मेसेज होतोय व्हायरल

गंभीर जखमी झालेल्या युवराज निघोट यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी प्रणव सोनार,अनिल सोनार,किरण कुलकर्णी आणि गणेश कुलकर्णी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे मंचर परिसरात खळबळ उडाली असून, सीसीटीव्हीमधील दृश्ये सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


Topics mentioned in this article