जाहिरात

Jalgaon News: मासे पकडताना तरुणासोबत भयंकर घडलं, अंजनी नदीला पूर आल्यावर थेट झाडावरच चढला अन् नंतर..

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे चावलखेडे येथील अंजनी नदीला अचानक मोठा पूर आला.

Jalgaon News: मासे पकडताना तरुणासोबत भयंकर घडलं, अंजनी नदीला पूर आल्यावर थेट झाडावरच चढला अन् नंतर..
Jalgaon Anjani River Flood News Today

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon Anjali River Flood : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे चावलखेडे येथील अंजनी नदीला अचानक मोठा पूर आला.यावेळी नदी पात्रात मासे पकडत असलेला एक तरुण पुराच्या पाण्यात अडकला.जीव वाचवण्यासाठी त्याने नदीतील एका झाडावर चढून आश्रय घेतला.गेल्या पाच तासांपासून हा तरुण झाडावरच अडकून होता.प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र नदीचा प्रचंड प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पातळी यामुळे बचावकार्यात अद्याप यश आलेले नाही. सुरेश छगन अहिरे असं नदीच्या पूरात अडकलेल्या तरुणाचं नाव आहे.

अंधार पडल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या

दरम्यान, तरुणाच्या बचावासाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेतली जाणार असून पथक आल्यानंतर विशेष बचावमोहीम हाती घेतली जाणार आहे. सध्या अंधार पडल्यामुळे बचावकार्यात अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुराच्या पाण्यात झाडावर अडकलेल्या तरुणाशी संपर्कही होत नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

नक्की वाचा >> Dhule News : फ्रिज वाचवण्याच्या प्रयत्नात बाप-लेक कणेरी नदीच्या पुरात वाहून गेले, 'त्या' दोघांसोबतही जे घडलं..

धरणातून 5500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अंजनी धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. अंजली धरणातून 5 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग अंजनी नदीपात्रात सोडण्यात आला. अंजनी नदीत पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठी न जाण्याचे आवाहनही सातत्याने नागरिकांना करण्यात आले होते.

मात्र असं असतानाही मासेमारीसाठी केलेला हा तरुण अचानक नदीतील पाणी वाढल्याने पुराच्या पाण्यात अडकला व जीव वाचवण्यासाठी त्यांनी नदीच्या मध्यभागी असलेल्या झाडावर चढून आश्रय घेतला. नियमित मासेमारी करत असल्याने कुठेतरी पुराचे पाणी कमी होईल या आशेने हा तरुण काही काळ झाडावर अगदी शांतपणे बसला होता.

नक्की वाचा >> Pune News: खडकवासला धरणातून 45 हजार क्युसेक विसर्ग, एकतानगरीत पूरस्थिती, 'या' सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी

मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्याने अखेर ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली. स्थानिक प्रशासनाच्या वतीने बचाव कार्याला यश मिळाल्याने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करत सुरेश अहिरे या तरुणाला  सुखरूप काढले बाहेर काढले आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com