Nagpur News : पप्पा-पप्पा आवाज दिला, मोठमोठ्याने रडली; चिमुकलीसमोरच वडिलांचा बुडून मृत्यू

Nagpur News : एंजलसमोरचे अखिल हे पाण्यात बुडू लागले. त्यावेळी चिमुकली वडिलांना हाक देऊ लागली. वडिलांना बुडताना पाहून ती जोरजोरात रडू लागली.

जाहिरात
Read Time: 1 min

संजय तिवारी, नागपूर

Nagpur News : आंघोळीला गेलेल्या वडिलांचा चिमुकलीसमोर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथील तलावात ही घटना घडली. अखिल नामदेव शिंदे असं 32 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार,  सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अखिल गावातील तलावाकडे आंघोळीला गेले होते. यावेळी त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी एंजल देखील सोबत होती. तलावाच्या पायरीवर साचलेल्या चिखलामुळे पाय घसरल्याने ते थेट पाण्यात पडले. मात्र पोहता येत नसल्याने काही क्षणातच ते पाण्यात बुडाले. 

(नक्की वाचा-  नवी मुंबईत पाकिस्तानी महिलेची निघृणपणे हत्या; पतीचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात)

एंजलसमोरचे अखिल हे पाण्यात बुडू लागले. त्यावेळी चिमुकली वडिलांना हाक देऊ लागली. वडिलांना बुडताना पाहून ती जोरजोरात रडू लागली. मात्र तिचं रडणं ऐकून मदतीसाठी यायला तिथे कुणीच नव्हतं. काही वेळातंच एंजलसमोरच अखिल यांचा मृत्यू झाला. 

अखिल शिंदे पत्नी काजल आणि मुलगी एंजल यांच्यासह नागपुरात राहत होते. गावातच ते एक छोटेसे कटिंग-दाढीचे दुकान चालवत होते. 

Topics mentioned in this article