Kalyan News : डोंबिवली, कल्याण शहराला जोडणारा 'रिंग रोड' प्रकल्प ठरतोय जीवघेणा, गांधारी-वडवलीत भयंकर घटना

डोंबिवली,कल्याण- टिटवाळा शहराला जोडण्यासाठी उभारण्यात आलेला महत्त्वाकांक्षी 'रिंग रोड' प्रकल्प आता सामान्य नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Ring Road Accident
मुंबई:

Kalyan Ring Road Accident : डोंबिवली,कल्याण- टिटवाळा शहराला जोडण्यासाठी उभारण्यात आलेला महत्त्वाकांक्षी 'रिंग रोड' प्रकल्प आता सामान्य नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. कल्याण जवळील गांधारी-वडवली नवीन रिंग रोडवर काही चालक रात्रीच्या वेळी कार रेसिंग आणि जीवघेणी स्टंटबाजी करतात. यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या चालकांच्या बेजबाबदारपणामुळे एका नागरिकाला मृत्यूशी झुंज द्यावी लागली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विकास विठ्ठल कुंभार (49) हे कल्याण पश्चिम येथील 'आदित्य ऑटोमोबाईल' गॅरेजचे मालक आहेत. 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 ते 11 च्या सुमारास कुंभार दुचाकीवरून त्यांच्या घरी जात होते. नवीन वडवली रोडवरून प्रवास करताना पाठीमागून येणाऱ्या एका
भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.  ​ही धडक इतकी भीषण होती की विकास कुंभार यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर संबंधित कार चालकाने जखमी झालेल्या व्यक्तीला कोणतीही मदत न करता तिथून पळ काढला. 

Advertisement

नक्की वाचा >> T20 World Cup 2026, IND v SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात दोन सख्खे भाऊ आमनेसामने, "आमच्या आईला टेन्शन.."

त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी जखमी विकास कुंभार यांना तातडीनं कल्याणच्या वेदान्त हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.त्यांची प्रकृती चिंताजनक असून  त्यांना पुढील उपचारासाठी आयुर हॉस्पिटल येथील आयसीयू (ICU) मध्ये हलवण्यात आले आहे.त्यांचा मुलगा श्रेयश विकास कुंभार (23) याने  खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. 

नव्याने बांधण्यात आलेला रिंग रूट प्रकल्प अजूनही नागरिकांसाठी सुरु करण्यात आला नाही. रात्रीच्या वेळी तरुण मुले येथे कार रेसिंग आणि दुचाकीवर जीवघेणे स्टंट करतात. पोलिसांनी यापूर्वी कारवाईचा बडगा उगारला असतानाही काही चालक कार रेसिंग आणि स्टंटबाजी करतात.

नक्की वाचा >> Shocking News: चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर अत्याचार, पीडितांनी पालकांना सर्वकाही सांगितलं अन्..

सीसीटीव्ही कॅमेरे आणि गतिरोधक नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार रेसिंग व मोटरसायकल स्टंटबाजीच्या घटना घडतात. यामुळे येथे ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. स्थानिक नागरिकांनी आणि जखमीच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या परिसरात पोलिसांनी ग्रस्ती घालत भरधाव वेगाने गाडी चालवणार व कारवाई करावी, अळी मागणी केली जात आहे.