किशोर बेलसरे, नाशिक
पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातूनसमोर आली आहे. कोयत्याने वार करुन आणि कूकरच्या झाकणाने मारहाण करत आरोपी पतीने पत्नीची हत्या केली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार आहे. आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सविता गोरे असं मृत महिलेचं नाव आहेत. तर छत्रगुन गोरे असं आरोपी पतीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने प्रेम विवाह केल्याने पती-पत्नी दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पती वाद होत होते. मंगळवारी सकाळी मुलगा बाहेर गेल्यानंतर पु्न्हा एकदा सविता आणि छत्रगुन यांच्या वाद झाला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
(नक्की वाचा - Crime News : घरापासून अवघ्या 100 मीटरवरुन बिल्डरच्या मुलाला पळवलं, तासाभराने फोन आला अन् कुटुंब हादरलं!)
वाद एवढा वाढला की छत्रगुनने रागात सवितावर कोयता आणि कूकरच्या झाकणाने हल्ला केला. या हल्ल्यात सविता यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पतीने घटनास्थळावरुन पळ काढला.
(नक्की वाचा- Praneet More : वीर पहारियाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण)
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी येत पंचनामा केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यानंतर पती फरार असून त्याचा तपास घेतला जात आहे.