जाहिरात

Praneet More : वीर पहारियाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Standup comedian Praneet More) याला सोलापुरात (Solapur News) मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Praneet More : वीर पहारियाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Standup comedian Praneet More) याला सोलापुरात (Solapur News) मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 2 फेब्रुवारी रोजी प्रणित मोरे याचा सोलापुरात कार्यक्रम पार पडला. एका हॉटेलमध्ये हा शो झाला. या शोदरम्यान 12 जणांना जमाव प्रणितकडे फोटोच्या निमित्ताने गेला आणि मारहाण करू लागला. धक्कादायक बाब म्हणजे प्रणित मोरे सोलापुरात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला तरीही त्याची तक्रार दाखल करून घेतली नाही. (Standup comedian Praneet More beaten)

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मारहाण का झाली?
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याने वीर पहारिया याच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट स्काय फोर्स चित्रपटातून वीरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. वीर पहारिया याच्याविषयी चुकीचं वक्तव्य केल्यामुळे सोलापुरात त्याला मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे सोलापुरात पोलीस ठाण्यात प्रणित तक्रार दाखल करण्यासाठी गेला, तरीही पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेतली नाही.  

वीर पहारियाने व्यक्त केली दिलगिरी...
दरम्यान प्रणितला झालेली मारहाण पाहून वीर पहारियाने त्याची प्रतिक्रिया देताना म्हटलं, प्रणितसोबत जे घडलं त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही. त्याला झालेली मारहाण नक्कीच निंदनीय आहे. याबद्दल मी त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. या घटनेत जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. त्याचा पाठपुरावा देखील मी करणार आहे, असं म्हणत वीर पहारिया याने प्रणितसोबत झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Udit Narayan  उदित नारायणनं भर कार्यक्रमात महिला फॅन्ससोबत केले अश्लील वर्तन, फॅन्स संतापले Video

नक्की वाचा -  Udit Narayan उदित नारायणनं भर कार्यक्रमात महिला फॅन्ससोबत केले अश्लील वर्तन, फॅन्स संतापले Video

वीर पहारिया कोण आहे? काय आहे सोलापूर कनेक्शन?
अक्षय कुमार स्टारर स्काय फोर्स हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात वीर पहारियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर वीर पहारियाची मोठी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये जान्हवी कपूर आणि सारा अली खान आल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या रिलेशनशीपविषयी काही खुलासे केले. त्यांनी ज्या दोन भावांसोबत रिलेशनशीप असल्याचा उल्लेख केला होता, त्यातील एक वीर पहारिया आहे. वीर पहारिया हा सारा अली खानला डेट करीत असल्याच्याही चर्चा होत्या. 

दरम्यान त्याचं सोलापूर कनेक्शन म्हणजे तो माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सुशीलकुमार यांचा नातू आहे. सोलापुरात सुशीलकुमार यांचं मोठं नाव आहे. मूळचे सोलापूरचे असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी 2023 साली राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. प्रणिती शिंदे या सोलापूरातील खासदार आहे. त्या सोलापुरातून तीन टर्म आमदारही राहिल्या आहेत. सुशीलकुमार यांना तीन मुली. त्यातील स्मृती शिंदे यांनी उद्योगपती संजय पहारियासोबत लग्न केलं होतं. काही वर्षांपूर्वी ते विभक्त झाले. वीर पहारिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: