Hapus Mango Rate: उन्हाळ्याची चाहूल लागताच फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंबाही बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागला आहे. यंदा सुरुवातीच्या काळात आवक कमी असल्याने हापूसचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे चित्र आहे. कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून, राज्यातील विविध शहरांमध्ये हे वेगवेगळ दर पाहायला मिळत आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही अस्सल हापूसची प्रतीक्षा कायम आहे.
बाजारपेठेतील सद्यस्थिती: कुठे काय दर?
कोकणात हापूसचा गोडवा महागला
- हापूसचे माहेरघर असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच दर सध्या तेजीत आहेत.
- देवगड हापूस: प्रति डझन 1500 ते 3000 रुपयांपर्यंत विकला जात आहे.
- रत्नागिरी हापूस: 1000 ते 2000 रुपये प्रति डझन असा भाव मिळत आहे.
- आंब्याच्या पेटीचे दर: 4 ते 6 डझनच्या पेटीसाठी ग्राहकांना 5 हजार ते 6 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
पुण्यासह प्रमुख शहरांमधील आंब्याचे दर
राज्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबईमध्ये (APMC) हापूस आंबा 2500 रुपयांपासून ते 7 हजार रुपयांपर्यंत विकला जातोय. पुण्याजवळील पिंपरीमध्ये 2300 रुपये ते 2600 रुपये, तर बारामतीमध्ये 1700 रुपये ते 2200 रुपये प्रति डझन दर आहेत. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये 1500 रुपये ते 1800 रुपये दर असून, अहिल्यानगरमध्ये तुलनेने स्वस्त म्हणजे 900 रुपये ते 1500 रुपयांत डझनभर आंबे मिळत आहेत. मराठवाड्यातील जालना येथे 1500 रुपये ते 4000 रुपयांपर्यंत मोठी तफावत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लातूरमध्ये किलोवर विक्री होत असून 250 रुपये ते 300 रुपये किलो असा दर आहे, तर जळगावमध्ये हाच दर 1000 रुपये ते 1100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.
(नक्की वाचा: Pune News: आषाढी वारीवर मुक्कामाचे सावट; पुण्याच्या जागेवरून वाद पेटला, काय होणार निर्णय?)
कर्नाटकातील आंबानांदेडमध्ये हापूसचे दर 1200 रुपये प्रति किलो असले, तरी बाजारपेठेत कर्नाटकातील आंबे विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. चवीत आणि सुगंधात साम्य असलेल्या इतर जातींच्या आंब्यांना हापूस म्हणून विकले जात असल्याने ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
(नक्की वाचा: LPG vs PNG: पीएनजी की एलपीजी, घरगुती वापरासाठी कोणता गॅस सुरक्षित? LPG आणि PNGमध्ये काय आहे फरक? वाचा सविस्तर)
अनेक बाजारपेठा अजूनही प्रतीक्षेत
एकडे मोठ्या शहरांत हापूस दाखल झाला असताना, राज्याच्या काही भागांत अजूनही आंब्याची प्रतीक्षा आहे. वर्धा, पंढरपूर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि बुलडाणा येथील बाजारपेठांमध्ये अद्याप आवक झालेली नाही. एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात आवक वाढल्यानंतर हे दर काहीसे कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील हापूस आंब्याचे दर (प्रति डझन किंवा किलो) खालीलप्रमाणे आहेत:- सिंधुदुर्ग: देवगड हापूस आंबा- 1500 रुपये ते 3 हजार रुपये (1 डझन)
रत्नागिरी: 1 हजार ते 2 हजार रुपये (1 डझन)
आंब्याची पेटी (4 डझन ते 6 डझन) - 5 हजार ते 6 हजार रुपये - नवी मुंबई(APMC): 2500 रुपये ते 7 हजार रुपये
- नाशिक : 1500 रुपये ते 1800 रुपये हापूस (1 डझन)
- पुणे : 1 हजार ते 2 हजार रुपये (1 डझन)
- बारामती: 1700 रुपये ते 2200 रुपये (1 डझन)
- पिंपरी: 2300 रुपये ते 2600 रुपये (1 डझन)
- अहिल्यानगर : 900 रुपये ते 1500 रुपये (1 डझन)
- जालना :1500 रुपये ते 4000 रुपये(1 डझन)
- लातूर : 250 रुपये ते 300 रुपये (1 KG)
- नांदेड 1200 रुपये प्रतिकिलो, पण कर्नाटकी हापूस आंबा मिळतोय.
- सोलापूर : हापूस आंबा किमान दर: 1200 रुपये
कमाल दर: 3200 रुपये
सर्वसाधारण दर: 2000 रुपये (1डझन) - जळगाव: देवगड हापूस आंबा 1 हजार रुपये प्रतिकिलो, एक डझनप्रमाणे 2,500 रुपये
रत्नागिरी हापूस आंबा 1,100 रुपये प्रतिकिलो, एक डझनप्रमाणे 2,700 रुपये
वर्धा, पंढरपूर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बुलडाणा येथे बाजारामध्ये आंबा दाखल झालेला नाही.