Mumbai Pune Traffic: "बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल, टोल वाढवायचा..", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट Viral

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. अशातच मराठी अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mugdha Godbole Ranade On Mumbai Pune Traffic Jam
मुंबई:

Marathi Actress On Mumbai Pune Traffic Jam : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. अनेक लोकांचे प्रचंड हाल झाल्यानं लोकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.या वाहतूक कोंडीत प्रवाशांना अक्षरश:अन्न पाण्याविना रात्र काढावी लागली. पोलिसांनी काही प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची उपलब्धता करून दिली. परंतु, काही जण अन्न पाण्याच्या शोधातच राहिले. अशातच मराठी अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरकारचे वाभाडे काढले आहेत. 

काय म्हणाल्या मुग्धा गोडबोले रानडे?

मुग्धा गोडबोले रानडे म्हणाल्या,  "भयंकर आहे..गेली तीस वर्ष मी सातत्याने हा प्रवास करते आहे. वेगवेगळ्या वाहनांमधून करते आहे.  बस, ट्रेन, टॅक्सी, गाडी यापैकी त्या त्या वेळी जे सोयीचं असेल ते. सुरुवातीला 5-6 तास लागायचे.मध्ये कधीतरी तो 'द्रुतगती 'झाला.यात सातत्य इतरही गोष्टीत आहे.टोलची रक्कम वाढणे.वाढत जाणे.पण रस्ता तितका चांगला न राहणे. चालकांनी नियम न पाळणे. त्याबद्दल कुणीही काहीही न करणे. कधीही कोणतीही सूचना न देता लेन्स बंद असणे. घाटात ट्रॅफिक जॅम असणे.ट्रक्स आणि टेम्पोने तिन्ही लेन्स ब्लॉक करून ठेवणे.गेले दोन दिवस पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर जे झालं आहे हे अक्षम्य आहे.रस्त्याचे पदर वाढवायचे..म्हणून टोल वाढवायचा..तरीही हे असं कसं होतं?असा प्रश्नही मुग्धा गोडबोले यांनी उपस्थित केला आहे. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्याच्या तळेगाव दाभाडेत रक्तरंजित थरार, दारू पार्टीत मित्राचा भयंकर शेवट, हादरंवून टाकणारं कारण

बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल.गाडीत लहान मुलं,म्हातारी माणसं,आजारी माणसं,गरोदर बायका असतील.लोकांच्या व्हिसा अपॉईंटमेंट्स (visa appointments) गेल्या.विमानं चुकली, प्रचंड आर्थिक नुकसान झालं. हे वेळीच थांबवता आलं नसतं का? निर्णय घेऊन डॅमेज कमी करता आला नसता का? याला कोण जबाबदार आहे? असा सवाल उपस्थित करत मुग्धा गोडबोले यांनी शासकीय यंत्रणांवर निशाणा साधला आहे.